नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
विजेचा लपंडाव शहरी भागासह ग्रामीण भागातही नित्याचाच असतानाही विद्युत वितरण कंपनी शाखा नायगांव येथील कार्यरत कर्मचारी विक्रम भालेराव या लाईनमॅन वर तालुक्यातील एकूण दोन हेडकॉटर मधील सहा गावाचा भर असून या गावातील ग्रामस्थांनी त्यांच्या कार्यप्रणालीवर समाधान व्यक्त करीत आहेत.
आपल्या परिस्थितीची जाण ठेवून लाईनमॅन विक्रम किशन भालेराव यांनी दहा-बारा वर्षांपासून सेवेत असताना आपल्या कामाविषयी कौतुक पणा मिळविले असून सध्या तालुक्यातील दोन हेडकॉटर देगाव व पळसगाव यातील गावे टाकळगाव, ताकबीड, गंगनबीड येथे कार्यसेवा करताना ग्रामीण भागातील विविध विद्युत पुरवठा समस्येला सहजरीत्या त्यांनी हाताळून सुरळीतपणे विद्युत पुरवठा पुरविण्याचे काम भालेराव यांनी केले असून कोणाच्याही दबावाला किंवा चार पैशाला बळी न पडता कार्यसेवा करीत असल्याने सदर गावातील ग्रामस्थानी लाईनमेन विक्रम भालेराव यांचे तोंडभरून कौतुक करताना दिसुन आले, त्यांच्या कार्याची दखल घेऊन मागे त्यांना एक पुरस्कारही मिळाला होता, अनेक कार्यालयात अनेक कामाचा बोजा असणारे कर्मचारी निष्ठेने काम करून आपल्या कार्याचा व नावाचा प्रामाणिकपणा जपतात हे महत्त्वाचे ठरत असले तरी एका कर्मचाऱ्यावर पाच सहा गावे लादली जात असताना कर्मचारी वर्गाची कमतरता भासत असल्याने नायगांव येथील उपकार्यकारी अभियंता श्री कौरवार यांनी रिक्त पदे भरण्यासाठी वरिष्ठाकडे मागणी करावी असे मात्र नागरिकातून बोलल्या जात आहे.

COMMENTS