अहमदपूर.दि.
लातूर-नांदेड या राष्ट्रीय महामार्गावरील पडलेले खड्डे वेळेत बूजविले नसल्याने अखेर सदरची निविदा रद्द करून अनामत रक्कम जप्त करण्याची प्रक्रीया वरिष्ठ कार्यालयाकडून सूरू होताच खडबडून जागे झालेल्या कंत्राटदाराने अखेर नांदेड-लातूर महामार्गावरील लोहा-चाकूर या मार्गावरील सांगवी सूनेगांव येथून खड्डे बूजविण्यास सुरूवात केली.
नांदेड-लातूर या राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड खड्डे झाल्याने वाहनधारकांना प्रचंड कसरत करत जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत होता.खड्ड्यामळे झालेल्या अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागला. ही मागणी घेवून वेळो वेळी विविध राजकीय पक्ष,संघटना व लोकप्रतिनिधी मार्फत रसत्यावरील खड्डे बूजविण्या बाबत निवेदने देवून प्रसंगी अंदोलने झाली होती.परंतू सातत्याने मोघम आश्वासने मिळत राहीले मात्र प्रत्यक्षात कामाला सुरूवात केली नव्हती.
या सर्व बाबीला कंटाळून येथील यूवकनेते डाॅ.सिध्दार्थकूमार सूर्यवंशी यांनी थेट केंद्रीय रस्ते वहातूक मंत्री ना.नितीनजी गडकरी साहेब यांची भेट घेवून सदरील रस्त्यावरील तूर्त खड्डे बूजवून(NH 361)रस्त्याच्या चौपदरी करणाचे काम तातडीने सूरू करण्याची विनंती केली होती.
तसेच या खड्यांमूळे नागरींकाना गेल्या वर्ष भरापासून प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. औसा-चाकूर,चाकूर -लोहा आणी लोहा-वारंगा या मार्गावरील वरील खड्डे बूजविण्याच्या निविदा काढल्या गेल्या चाकूर ते लोहा वगळता दोन्ही मार्गावरील खड्डे बूजविण्याचे काम युध्द पातळीवर सूरू झाले परंतू चाकूर-लोहा या कामाला कंत्राटदाराने सुरूच केले नाही परिणामी नागरीकांमध्ये प्रचंड असंतोष असून तातडीने कार्यवाही होणे गरजेचे असल्याची बाब ना.गडकरी साहेब यांच्या निदर्शनास आणून दिली होती.
य गंभीर बाबीबद्दल ना.गडकरी साहेबांनी प्रकणात लक्ष घालताच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण नांदेड चे प्रकल्प संचालक श्री.सूनिल पाटील यांनी निविदा नियमावली आणी करारपत्राप्रमाणे
थेट निविदा रद्द करण्याची शिफारस दिनांक 26/11/2020 रोजी प्रादेशीक कार्यालय(NHAI) नागपूर यांच्या कडे केली.
अधिकारीस्तरावर सूध्दा एक दोन बैठका झाल्या होत्या आता निविदा रद्द होण्याच्या भितीने संबंधीत कंत्राटदाराने अवघ्या तीस-या दिवशी सांगवी(सू.)येथून कामाला सुरूवात केली आहे.
आज स्वतः प्रकल्प संचालक श्री.सूनिल पाटील यांनी या कामाला भेट देवून लोहा ते चाकूर या रसत्यावर एकूण तिन ठिकाणी मशीन्स लावुन युध्द पातळीवर काम सुरूवात करण्याच्या सूचना संबंधीत कंत्राटदारास दिल्या आहेत.
नागपूर येथे (NH 361)संबंधाने ना.नितीनजी गडकरी साहेबांकडे बैठक:-
गेल्या वर्ष भरापासून NH361या राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत ना.गडकरी साहेबांचे लक्ष वेधले असता सदरील रस्त्याच्या संबंधाने नागपूर येथे दिनांक 03/12/2020 रोजी त्यांनी बैठक आयोजीत केली असल्याची माहीती वरिष्ठ कार्यालयाकडून मिळाली आहे.या बैठकीत काय निर्णय होतो या कडे या भागातील नागरीकांचे लक्ष लागले आहे.
एकूणच गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या खड्डे बूजविण्याच्या कामास सामूहीक पाठपूराव्यामूळे यश प्राप्त होत असल्याचे चित्र दिसत आहे. या कामी लक्ष घालून काम मार्गी लावल्या बद्दल केंद्रीय रस्ते वहातूक मंत्री ना.नितीनजी गडकरी साहेब यांचे या भागातील नागरीकांच्या वतीने युवकनेते डाॅ. सिध्दार्थकूमार सूर्यवंशी यांनी आभार व्यक्त केले आहेत.


COMMENTS