केज / प्रतिनिधी
केज तालुक्यातील चिंचोली माळी येथे बुधवारी सकाळी दहा वाजता येथील शेतकरी प्रशांत सतीश देशमुख यांच्या शेतात कृषी विभागाकडून राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत मृदा आरोग्य पत्रिका अभियान कार्यक्रम संपन्न झाला.
याविषयी सविस्तर वृत्त असे की शेतकर्यांना माती परीक्षणाचे महत्व तसेच मातीचा नमुना कसा घ्यावयाचा व सेंद्रिय शेतीचे महत्व यासारख्या महत्वपूर्ण बाबींची माहिती मिळावी या उद्देशाने कृषी विभागाच्या राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत मृदा आरोग्य पत्रिका अभियान कार्यक्रम तालुक्यातील चिंचोली माळी येथे संपन्न झाला. यावेळी चिंचोली माळी च्या कृषी सहाय्यक श्रीमती आर. बी. पवार मॅडम यांनी संरक्षित पाणी व बीज प्रक्रिया कशी करावी व सेंद्रिय शेतीचे महत्त्व याबद्दल माहिती दिली. तर केज मंडळाच्या मंडळ कृषी अधिकारी श्रीमती व्ही. व्ही. कदम मॅडम यांनी माती परीक्षणाचे महत्व तसेच माती नमुना कसा घ्यावयाचा तसेच खताची मात्रा किती प्रमाणात द्यावी व हरभरा पिकावरील कीड नियंत्रण कसे करावे याबद्दल शेतकऱ्यांना महत्त्वपूर्ण माहिती दिली.
या कार्यक्रमाला सरपंच सुनील बापू देशमुख, धीरज वनवे, रविकुमार गायकवाड, अनिल गलांडे, प्रशांत नाना देशमुख, शरद वशिष्ठ राऊत, वशिष्ठ भगवान राऊत, आकाश काळे, बिभीशन पवार, अनिल वनवे, महारुद्र चोपणे, प्रशांत सतीश देशमुख, अमिन शेख, यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

COMMENTS