नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
गुरूकृपा प्राप्त करण्यासाठी पूर्व संचित चांगले असले पाहिजे.गुरू या शब्दात गुह्य ज्ञान दडलेले आहे. ते ज्ञान प्राप्त झाल्यानंतर जिवनातील अज्ञान अंधकार दूर झाल्या शिवाय रहात नाही असे प्रतिपादन शिवकीर्तनकार त्र्यंबक स्वामी नंदगावकर यांनी केले.
श्रीसदगुरू विश्वनाथ स्वामी महाराज मठ संस्थान येलूर येथून निघणारी मन्मथ स्वामी महाराज पदयात्रा कोरोना महामारी मुळे रद्द करण्यात आली.परंतू गेल्या 19 वर्षा पासून अखंड चालणारी पदयात्रा खंडित होवू नये म्हणून नायगांव येथील मार्केंंडेश्वर मंदिर येथून ही पदयात्रा लालवंडी शिवारातील सिध्देश्वर मंदिरात पाच दिवस थांबवून भजन, कीर्तन, परमरहस्य ग्रंथ पारायण आदी धार्मिक कार्यक्रम पार पडले. गुरूवर्य विरभद्रेश्वर महाराज येलूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यक्रम संपन्न झाले.यावेळी शिवसंत लक्ष्मण महाराज यांच्या " गुरू प्रसादाची थोरी| महिमा असे श्रेष्ठ भारी | या अभंगावरील चिंतन शि.भ.प.त्र्यंबक स्वामी नंदगावकर यांनी केले.यावेळी बाबुराव लंगडापुरे, भगवानराव लंगडापुरे, शिवराज वरवटे, विश्वेश्वर महाराज कोलंबीकर, विकास भुरे, विठ्ठलराव कत्ते, परमेश्वर केते, बालाजी चौधरी, व्यंकटराव इंद्रे, मल्लिकार्जुन इंद्रे, सुधाकर चौधरी, बालाजी पाटील ताकबिडकर,कीशन महाराज ताकबिडकर,ज्ञानेश्वर विभूते, शिवप्रसाद कु-हाडे, यांच्या सह अनेक भक्त गावकरी मंडळी उपस्थित होते.

COMMENTS