नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
नायगांव येथील सतीश धोंडोपंत कवठेकर यांच्या घरी अज्ञात चोरट्याने चोरी करून एक लाख 31 हजार सहाशे रुपयाचे अज्ञात चोरट्यांनी चोरी करून पसार झाल्याची घटना घडली नायगांव शहरातील बेळगे नगरातील सतीश मेडेवाऱ यांच्या शेंगदाणे मिलच्या शेजारी असलेल्या सतीश धोंडोपंत कवटीकवार हे आपल्या सासुरवाडी टाकळगाव येथे कार्यक्रमासाठी सर्व परिवार सहित कार्यक्रमासाठी गेले होते कवटीकवार यांच्या घरात कोणी नसल्याची खात्री करून अज्ञात चोरट्यांनी घरातील चैन गेटचे कुलूप तोडून घरात शिरून घरातील गोदरेजचे कपाट फोडून त्यातील सोने चांदी चे दागिने व रोकड असे एक लाख 31 हजार 600 रुपयांची चोरी अज्ञात चोरट्यांनी करून लंपास झाल्याची घटना घडल्याची सतीश कवटीकवार यांच्या मुलगा संकेत हा सकाळी 11 वाजता आपल्या आजोळी हुन घरी आल्यानंतर वरील माहिती आपल्या वडीलास सांगितले सदरील चोरी दिनांक सोमवार आणि मंगळवार च्या मध्यरात्री घडल्याची घटना सतीश कवटीवार याने नायगाव पोलीस ठाणे येथील स पो नि पडवळ यांना कळविल्या वरून पोलिसांनि घटनास्थळी येऊन पंचनामा केला असून वरील चोरीची तक्रार पोलीस ठाण्यात दिल्याची सतीश कवटीकवार यांनी दिली.

COMMENTS