आधार मल्टीस्टेट च्या वतीने कोरणा योद्ध्यांचा जिल्हास्तरीय प्रमाणपत्र देऊन केला सन्मान
माजलगाव/प्रतिनिधी
कोरोना महामारीने संपूर्ण जगात गेल्या नऊ दहा महिन्या पासून थैमान घातले आहे या महामारीत माणूस माणसा जवळ जात नव्हता अशा भयंकर परिस्थितीत डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून कोरोना रूग्णांना उपचार देऊन अनेकांचे प्राण वाचवण्याचे महान कार्ये करत आहेत त्यांच्या कार्याला समाम असल्याचे मत छत्रपती कारखान्याचे उपाध्यक्ष मोहनराव जगताप यांनी व्यक्त केले .
आधार मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड माजलगाव च्या वतीने दि.१ डिसेंबर २०२० रोजी सकाळी ११ वाजता कोवीड सेंटर केसापुरी केम्प येथे जिल्हास्तरीय कोरोना योद्धा सन्मान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन मोहनराव जगताप प्रमुख पाहुणे म्हणून बीड जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष तुकाराम येवले पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष उमेश मोगरेकर, तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुरेन्द्र रेदासणी, माजलगावचे नगरसेवक शरद यादव,संतोष यादव, पत्रकार विष्णू उगले इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम कार्यक्रमाचे प्रास्ताविक आधार मल्टीस्टेट चे अध्यक्ष सुनील सौंदरमल यांनी केले व सन्मान चिन्ह चे वाचन श्री अशोक डोंगरे यांनी केले त्यानंतर सर्व डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचारी व परिसरामध्ये कार्य करणारे इतर कर्मचारी यांना प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ देऊन त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना आधार मल्टीस्टेट चे अध्यक्ष सुनिल सौंदरमल म्हणाले की कोरोनाच्या महामारी च्या काळामध्ये माणूस माणसाला नकोसा झाला होता माणूस पाहुणा घरी आला तरी घरी येऊ देऊ वाटत नव्हते एवढी भयानक परिस्थिती निर्माण झाली होती आणि अशा या परिस्थितीमध्ये लोकांना धीर देणे ,लोकांना आधार देणे, आणि लोकांचा जीव वाचवण्याचे काम ज्या योद्ध्यांनी केलं त्या योजनांचा सन्मान करणं त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकणे व त्यांना मायेचं पांघरुन घालणे हे आपलं आद्य कर्तव्य आहे आपण काही बातम्या वाचल्या होत्या की कोविड सेंटर मध्ये काम करणारे डॉक्टर्स आणि नर्स या लोकांना घर मालकांनी घरातून बाहेर काढून टाकले एवढी वाईट वागणूक त्यांना दिली परंतु खरेखुरे चालते-बोलते देव जर कोण असतील तर ते डॉक्टर आणि त्यांना सहकार्य करणारे कर्मचारी आहेत यांच्यामुळे आपल्याला जीवदान मिळाले यांच्यामुळे आपण जिवंत आहोत आणि म्हणून आपण ज्या समाजातून जन्माला आलो त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो म्हणून आधार मल्टीस्टेट च्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन मोहनराव जगताप यांनी आधार मल्टीस्टेट च्या सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले व त्यांनी पुढे येऊन या योध्याचं सन्मान केला त्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले याप्रसंगी तुकाराम बापू येवले आणि उमेश काका मोगरेकर यांनी मनोगत व्यक्त केले तसेच यांच्यावतीने डॉक्टर शिंगणे साहेब व कुमारी डॉक्टर रोहिणी थावरे यांनी मनोगत व्यक्त केले व या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आधार मल्टीस्टेट चे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय राऊत यांनी मानले

COMMENTS