- गळ्याला मोठी दुखापत झाल्याने आवाज झालाय बंद
- दोन वर्षापासून पति शहाजी भासले पँरलेस आजारात एकाच जागेवर पडुन
- एकर जमीन मुलगा करतोय मोलमजुरी ,दवापाणी,आणि उदरनिर्वाहासाठी कुटुंबातील व्यक्तींना करावा लागतोय वेतनामय सामना
- आर्थिक मदतची अंत्यत गरज
- आ. सुरेश धस ,आ.बाळासाहेब आजबे ,सरपंच तात्या कदम यांनी केलेले सहकार्य आमच्यासाठी मोलाचे ठरले
आष्टी (दादासाहेब बन)
आष्टी तालुक्यातील जोगेश्वरी पारगाव येथे नरभक्षक बिबट्याने एका दिवशी दोन हल्ले करून पहिल्या हल्ल्यातील जखमी झालेल्या शालन शहाजी भोसले वय वर्ष पंचावन्न ह्या अहमदनगर येथून उपचार घेऊन तब्बल चौदा दिवसांनी घरी परतल्या परंतु त्यांच्या बिबट्याच्या तीक्ष्ण दाताने मानेला खोलवर इजा झाल्याने स्वर् नलिका पूर्णपणे डॅमेज झाली. त्यामुळे त्यांचा आवाज बंद झाला आहे .अत्यंत कुटुंबाची हलाखीची परिस्थिती घरामधील करता माणूस दोन वर्षापासून पॅरलेस च्या आजारामुळे एकाच ठिकाणी पडून आहे.मुलगा मोलमजुरी करतोय ,शैती जेमतेम एक एकर यामधून जीवन जगायचे कस? दवा पाणी कसा करायचा ?असे अनेक प्रश्न या पीडित कुटुंबाच्या समोर उभे राहिले आहेत .29 डिसेंबर रोजी जोगेश्वरी पारगाव येथील रहिवासी असलेल्या शालन शहाजी भोसले आपल्या घराच्या पाठीमागील शेतामध्ये शेतातील कामानिमित्त गेल्या असता त्यांच्याच भावकीतील शारदा सयाजी भोसले वय वर्ष साठ, स्वाती विजय भोसले 32 ,नातु राहुल विजय भोसले,पुतण्या विजय सयाजी भोसले 38 हे सर्वजण थोड्या थोड्या अंतराने शेतामध्ये काम करत होते .सकाळचे साडे दहा वाजण्याच्या सुमारास अचानक बिबट्याने वयोवृद्ध असलेल्या शालन भोसले यांच्यावर पाठीमागून हल्ला केला. या हल्ल्यात बिबट्याने आपल्या जबड्याने शालन यांना घट्ट धरून मानेला जोरदार हिसकेे दिले हे हे पाहून जवळ असलेल्या पुतण्या विजय सयाजी भोसले वय वर्ष 38 याने आपल्या काकीवर होत असलेला हल्ला तुला पाहून न डगमगता आपल्या जिवाची पर्वा न करता त्यांना वाचवण्यासाठी त्याच्यामागे धावत जाऊन यांचे पाय धरून बिबट्याच्या तोंडातून त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करत असताना बिबट्याने या दोघांनाही जवळपास चाळीस-पन्नास फूट फरफटत ओढत नेले .ही घटना घडत असताना उपस्थित बाकीचे लोक भीतीने मोठ्याने ओरडत होते या झटापटी मध्ये बिबट्याने शालन यांना सोडून विजय वर हल्ला केला या हल्ल्यात विजय वाचला. सर्वांनी एकत्रित येऊन बिबट्याच्या दिशेने दगडफेक केली .यामुळे बिबट्याने तिथून पळ काढला . या बिबट्याच्या हल्ल्यात शालन यांच्या मानेभोवती मोठ्या जखमा झाल्या बिबट्याचे तीक्ष्ण दातामुळे त्यांच्या गळ्याला खोलवर इजा झाली .अशाच परिस्थितीमध्ये मोठ्या धैर्याने विजय भोसले यांनी शालन यांना उपचारासाठी आष्टी ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी आणले. आमदार सुरेश धस यांच्या पुढील मार्गदर्शनाने शालन यांना अहमदनगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले .अत्यंत जीवघेण्या हल्ल्यातून शालन भोसले यांच्या जीवावर बेतलेल्या हल्ल्यातून त्या वाचल्या या हल्ल्यात त्यांचा जीव वाचला परंतु त्यांचा आवाज कायमस्वरूपी बंद झाला .शालन भोसले यांचा मुलगा गावाकडे एक एकर शेती असल्याने या शेती माध्यमातून कुटुंबाचा आर्थिक उत्पन्नाचे साधन कमी असल्याने वडील शहाजी भोसले दोन वर्षापासून प्यारलेस आजाराने अंथरुणात पडून आहेत त्यांचा दवापाणी खर्च व कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी पुणे येथे खाजगी कंपनीत पत्नी व मुलांना घेऊन काम करत होता. आज या बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेली आई ही आपल्या वडिलांची घरी काम करुन देखभाल करत होती . ती या बिबट्याच्या हल्ल्यामुळे जाग्यावर पडून आहे. आई-वडील दोघेही जागेवर पडून असल्याने त्यांची देखभाल, दावा पाणी आणि संसार चालवणे कठीण परिस्थितीत मुलगा विनोद याच्यावर खूप मोठे आर्थिक मानसिक संकट कोसळले आहेत. अशा कठीण परिस्थितीत आमदार सुरेश धस ,आमदार बाळासाहेब आजबे ,गावचे सरपंच तात्या कदम यांनी आमचे मानसिक मनोबल वाढवले त्याचबरोबर आम्हाला प्रशासनानेही सहकार्य केले असले तरीही यापुढील अनेक समस्या या भोसले कुटुंबावर आलेल्या आहेत .त्यांना आजच्या परिस्थितीत मदतीची अत्यंत गरज असल्याचे चित्र स्पष्ट आहे.समाजातील दानशूर व्यक्तींनी ,समाजातील संघटना,विविध क्षेत्रातील मोठ्या व्यक्तींनी मदत करावी.


COMMENTS