नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
घुंगराळा गावातील तरुण, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी, पोलिस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी, व सर्व विद्यार्थी वर्ग यांच्या सोयीसाठी घुंगराळा ग्रामपंचायत च्या वतीने म्हाळसाकांत वाचनालय, अभ्यासिका केंद्र व व्यायामशाळेच्या इमारतीचा लोकार्पण व उद्घाटन सोहळा गावकऱ्यांच्या वतीने संपन्न झाला,अशी माहिती रा.यू. काँ. प्रदेश सरचिटणीस तथा गावचे उपसरपंच वसंत सुगावे पाटील यांनी दिली..
पूर्वी घुंगराळा गावातील तरुणांना अभ्यासिकेसाठी किंवा व्यायामशाळेत व्यायाम करण्यासाठी तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागत असे.. विद्यार्थ्यांची होणारी ही गैरसोय घुंगराळा गावचे उपसरपंच वसंत सुगावे पाटील यांच्या लक्षात येताच त्यांनी वाचनालय, अभ्यासिका व व्यायामशाळेचे काम हाती घेतले, आणि काही दिवसांतच ते काम पूर्णत्वास आणले.. वाचनालय,अभ्यासिका व व्यायामशाळेचे काम झाल्यामुळे घुंगराळा गावातील तरुण वर्गात आनंदाचे वातावरण आहे..
या वेळी व्यायामशाळेच्या इमारतीचे उद्घाटक म्हणून गोविंदराव पांचाळ, तर अध्यक्ष म्हणून संभाजीराव तुरटवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.तसेच श्री म्हाळसाकांत अभ्यासिका केंद्र व वाचनालय या इमारतीचे उद्घाटक म्हणून व्यंकटराव कंचलवाड व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माधवराव पा.ढगे यांची उपस्थिती होती. तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच प्रतिनिधी बालाजीराव मातावाड, से.स.सो.चे चेअरमन नारायण पा.ढगे,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माधव पा.ढगे, तंटामुक्ती अध्यक्ष श्याम पा.ढगे, मा.तंटामुक्ती अध्यक्ष चांडोळकर साहेब यांची उपस्थिती होती. उद्घाटनाच्या प्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक, अनेक युवक, विद्यार्थी, वृद्ध , शेतकरी, शेतमजूर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते..
COMMENTS