सरपंच महादेव डोके यांनी राबवलेल्या योजनेचे केले कौतुक
आष्टी (दादासाहेब बन)
आष्टी तालुक्यातील सालेवडगाव येथे नाबार्ड आणि बाय एफ संस्थेमार्फत सुरू असलेले पाणलोट क्षेत्राची कामे अतिशय उत्कृष्ट दर्जाची झाली असून याच धर्तीवर अनेक गावांमध्ये कामे करण्यात यावी यासाठी बाहेरून तालुक्यातील एकात्मिक विकास संस्था या कामाची पाहणी करण्यासाठी सालेवडगाव याठिकाणी येत आहेत. सालेवडगाव चे सरपंच महादेव डोके यांच्या मार्गदर्शनाखाली पाणलोठ क्षेत्राची कामे अतिशय सुंदर उत्कृष्ट दर्जाचे झाले असून अशाच पद्धतीची कामे आम्ही आमच्या गावाकडे करणार असल्याचे भेट देणाऱ्या नागरिकाकडून उदगार निघत आहेत. सालेवडगाव येथे नाबाड आणि बाय एफ संस्थेमार्फत दगडी कट्टा ,दगडी बांध ,माती नाला ,बांध बंधिस्ती, सखोल समतर चर, शेततलाव व बचत गट व्यवसाय अशी कामे करण्यात आली आहेत .या कामामुळे संपूर्ण गावात भरपूर फायदा होणार आहे .कर्जत जामखेड तालुक्यातील नान्नज जवळा ,मुंजेवाडी येथील एकात्मिक विकास संस्थेच्या 94 सदस्यांनी भेट दिली .या कामाची माहिती सरपंच महादेव डोके यांनी सविस्तर दिली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी डोके ,प्रकल्प अधिकारी सुरवसे ,इंजिनीयर बालवे, ग्रामसेवक आनारसे ,संदीप रोकडे, बाबा हजारे ,सतिष मल्लिनाथ,रामकिसन दहातोंडे ,पांडुरंग हजारे ,आजिनाथ हजारे, संपत जगताप ,ऋषिकेश हजारे ,डॉक्टर जाधव, नितीन वाडेकर,दिनेश डोके, सचिन डोके व ग्रामस्थ आणि महिला बचत गटाच्या पदाधिकारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
COMMENTS