*
केज प्रतिनिधी
बीड जिल्ह्यात जनावरांना लंपी रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. बीड जिल्ह्यातील पशुधन धोक्यात आले असून ऐन कोरोनाच्या काळात पशुधनावर संकट आल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. लंपी आजारासाठी लागणारी लस व निमतेल ,करंजतेल पशुविभागाकडे उपलब्ध नाही. तरी लंपी रोगासाठी लागणारी लस ,निमतेल, करंजतेल केज विधानसभा मतदार संघासह(केज,अंबेजोगाई, बीड तालुक्यासह)बीड जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून द्यावे अशा आशयाचे मागणीपत्राद्वारे पशुसंवर्धन राज्यमंत्री,पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई,तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्या कडे मागणी केली होती. त्याच पत्राची दखल घेऊन विडा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात तात्काळ तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दत्तात्रय मसने यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना मोफत लस देण्यात येणार आहे. विडा पशुवैद्यकीय दवाखान्यात लस उपलब्ध करून दिल्या बद्दल नंदकिशोर मुंदडा (काकाजी)यांचे ग्रामस्थांनी धन्यवाद मानले आहे.
COMMENTS