=============================
नायगाव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
.................................
आज प्रत्येक व्यक्ती कोणत्या न कोणत्या आजाराने त्रस्त आहे त्याचे प्रामुख्याने कारण म्हणजे रासायनिक खते वापरलेली पिकाची खाद्य, शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य, कित्येकांना जडलेली विविध प्रकारची व्यसने, अनेकांच्या अंगी आळशीपणा, शुगर, बीपी, मच्छरांचा उपद्रव यांनी दररोज शेकडो रुग्ण विविध दवाखान्यात उपचारासाठी जाताना आढळतात पण रुग्णाच्या अंधारमय जीवनाला प्रकाश देणारा तेजस्वी तारा म्हणजे वैद्यकीय तज्ञ डॉ. मधुसूदन दिग्रसकर यांचे नाव आदराने जनतेतुन घेतल्या जाते.
नायगांव शहरातील लाईफ लाईन दवाखान्यात रुग्णाची वर्दळ नेहमीच असते कारण त्यांच्यावर यशस्वी उपचार डॉ. दिग्रसकर यांच्याकडून होत असताना कित्येक रूग्न येथील उपचाराने समाधानता मानतात. असे कुणाला वाटत असेल नसेल की, आपण आजारी पडुन दवाखान्यात पैसा खर्च होऊ नये पण दिवसातून अनेक रुग्णांपैकी चार दोन रुग्ण लाईफमध्ये उपचारासाठी आल्यानंतर त्यांच्यावरील विविध आजारांच्या चाचणी करून उपचार व मेडिकल दिल्यानंतर हमखास तो बरा होतो मात्र तपासणी फिस, मेडिकल बिल, इतर खर्च देण्यासाठी तो गयावया करतो पण डॉ. दिग्रसकर मनाचा मोठेपणा दाखवत जेवढे देतील त्यावरच समाधान ते मानतात, काही महिन्यापूर्वी गुजरी येथील हृदयविकाराच्या रुग्णांवर यशस्वी उपचार केल्यानंतर त्यांचे मा. आ.वसंतराव चव्हाण यांच्यासह विविध स्तरातून अभिनंदन झाले, त्या दरम्यान काही पत्रकारांनी दिग्रसकरांना विचारले की, आपण आपला बिजनेस म्हणून की सेवा म्हणून हा पेशा सांभाळता, त्यावर माझ्या पोटापुरते मिळावे बस बाकी माझी चोवीस तास सेवा असणार आहे, असे ते म्हणाले, डॉ. दिग्रसकर यांची रुग्णसेवा निसिम आहे. नायगांव तालुक्यात कित्येकाकडून सदर डॉक्टर बद्दल कृतज्ञता मानली जाते, ध्येयवादी व त्यागी व्यक्तींचे नाव अनेकांच्या होटावर सहजपणे येणे म्हणजे हीच त्यांच्या कार्याची खरी पावती ठरते.
COMMENTS