अनुसुचित जमाती कल्याण समितीच्या सदस्यपदी कार्यसम्राट आ.डॉ.तुषार राठोड साहेब यांची निवड
नांदेड (विठ्ठल कल्याणपाड )
अनुसुचित जमाती कल्याण समितीच्या सदस्यपदी मुखेड-कंधार मतदारसंघाचे कार्यसम्राट आ.डॉ.तुषार राठोड साहेब यांची निवड करण्यात आली असून विधानसभा नियम २३५ महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांनी आ.डॉ.तुषार राठोड साहेब यांची निवड केल्याने मतदारसंघातील जनतेकडून अभिनंदन होत आहे . ३ नोव्हेंबर रोजी विधानसभा अध्यक्षांच्या हस्ते महाराष्ट्र विधानसभा नियम २३५ नुसार अनुसुचित जमाती कल्याण समितीची निवड करण्यात आली . या निवडीत अनुसुचित जमाती कल्याण समिती प्रमुख ( अध्यक्ष ) म्हणून दौलत दरोडा , विधानसभा सदस्य यांची निवड करण्यात आली . तर सदस्य म्हणून महाराष्ट्र विधानसभा सदस्य म्हणून कार्यरत असलेले श्री निवास वनगा यांच्यासह महेंद्र दळवी , अनिल पाटील , शिरीष चौधरी , साहसराम कोरोटे , डॉ. अशोक उईके , डॉ . तुषार राठोड , राजेश पाडवी , भिमराव केराम व राजकुमार पटेल यांची अनुसुचित जमाती कल्याण समितीच्या सदस्यपदी विधानसभा अध्यक्षांच्या हस्ते निवड करण्यात आली .
COMMENTS