माजलगाव/प्रतिनिधी
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर जगातील एकमेव विद्यार्थी आहेत की, त्यांचा शाळेचा पहिला प्रवेश हा विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो.दि 7 नोव्हेंबर 1900 रोजी सातारा येथील प्रतापसिंह हायस्कूल मध्ये शाळा प्रवेश घेतला होता.शाळा प्रवेश दिन तथा हा विद्यार्थी दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जात आहे.शहरातील फुलेंनगर येथील यशोधरा बुद्ध विहार या ठिकाणी ,डॉ बाबासाहेब आंबडेकर यांचा शाळा प्रवेश दिन, तथा विद्यार्थी दिन साजरा करण्यात आला .या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजकुमार सोनवणे सर हे होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. धम्मानंद बोराडे हे होते तसेच
प्रमुख वक्ते म्हणून रमेश जाधव सर हे होते.तर सूत्रसंचालन बाबासाहेब जाधव यांनी केले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना शाळेत प्रवेश मिळाला नसता तर आज या समाजाला या व्यवस्थे मध्ये प्रवेश मिळू शकला नसता राजकुमार सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले . तसेच या कार्यक्रमास,बाबासाहेब जाधव सर सिद्धार्थ जाधव सर निलेश गावडे सर रमेश जाधव सर एस ए साबळे सर लिंबाजी सोनपसारे,सर शिंदे सर,शिवाजी ससाणे सर,सोनवणे सर ,घाडगे सर अनेकांनी उपस्थिती लावली होती. आभार सुभाष बोराडे यांनी मानले तर कार्यक्रम यशस्वी करण्या करिता सर्व तरुणांनी परिश्रम घेतले होते.
COMMENTS