दीपावली काळात जनतेने सावध राहावे-पोलीस निरीक्षक फराटे
माजलगाव/भास्कर गिरी
दीपावली काळात परगावी जाणाऱ्या लोकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन शहर पोलीस ठाण्याचे नूतन निरीक्षक धनंजय फराटे यांनी केले.शनिवारी फराटे यांनी शहर पोलीस ठाण्याचा प्रभार घेतला.
सध्या दीपावली चा सण सुरू होत आहे त्यानिमित्ताने बाजारात खरेदीसाठी किंवा बाहेरगावी जाताना घरात पैसे, दागिने ठेऊन जाऊ नका.
दिपावळी साठी बाहेरगावी जायचे असल्यास घरात असलेले पैसे बँकेत ठेवावेत
आपण बाहेरगावी जाणार असल्यास आपल्या शेजाऱ्यांना आपण बाहेरगावी जात असल्याची माहिती द्यावी. बाहेरगावी जातांना महिलांनी प्रवासात दागिने घालून जावू नये..
प्रवासात कोणीही दिलेले खाद्य पदार्थ किंवा पेय खाऊ पिउ नयेत..त्यामध्ये गुंगीचे औषध असू शकते
प्रवासात अनोळखी महिला, पुरुषांपासून सावध रहावे
गर्दीच्या ठिकाणी व बसमध्ये चढताना, उतरताना आपले पॉकेट, पर्स, बॅगकडे लक्ष ठेवावे
व्यापारी, दुकानदार, सराफा यांनीही याकाळात मोठया प्रमाणात माल खरेदी केलेला असतो त्यामुळे रात्रीचे वेळी सुरक्षा ठेवावी, सी सी टी व्ही कॅमेरे लावावेत असे आवाहन माजलगाव शहर पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांनी केले
COMMENTS