पोलिस निष्क्रिय, जनता भयभीत
मादळमोही दि,१३ (संतोष भारती):-- गेवराई तालुक्यातील चंकलंबा पोलिस ठाण्याच्या हद्दीत शेतकर्यांच्या शेळ्या चोरणारी व दरोडे टाकणारी मोठी टोळी सक्रिय असुन तांदळा येथुन दि,१३ रोजी च्या मध्यरात्री पांडुरंग विश्वनाथ भारती यांच्या गोठ्यातुन चार शेळ्या आज्ञात चोरट्याने चोरुन नेहल्या, विशेष म्हणजे या टाळीने तिन ते चार महीन्यापासुन धुमाकूळ घातला आहे,हि मोठी सक्रीय टोळी आसुन दिवसाढवळ्या घरफोड्या करत आसल्याची माहीती समोर आली आहे, चंकलंबा पोलिस फिर्यादीना मलमपट्टी करत आहेत, या सततच्या घटनेमुळे जनतेत भिंतीचे वातावरण निर्माण झाले आहे, पोलिस निष्क्रिय बनले असुन पोलिसांच्या कार्यक्षमते वर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे, पोलिस अधिक्षक साहेब तुम्ही तरी लक्ष्य द्या अशी मागणी भयभित जनतेतुन केली जात आहे,
या बाबत असे कि,गेवराई तालुक्यातील तांदळा येथुन दि,१३ च्या मध्यरात्री पाडुरंग विश्वनाथ भारती हे गोठ्यातुन चार शेळ्या किंमत चाळीस हाजार रुपायाच्या चोरून नेहल्या त्याचा उदरनिर्वाह हा शेळीपालतुन होता,दिपावळी सणाच्या पुर्व रात्रीच चोर्याना पालन पोषण केलेल्या शेळ्या चोरुन नेहल्याने त्यावर आर्थिक संकट वढावले, या बाबत त्यांनी चंकलंबा पोलिस ठ्याणात सविस्तर फिर्याद दिली असुन गु,र, नं, 327/२०२० प्रमाणे आज्ञात चोरट्या विरोध्दात कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे,पुढिल तपास डोंगरे पोलिस करत आहे,
चौकट
पोलिसा कडुन फिर्यादीला आरोप्याची वागणुक
--------------------------;------- -------------- ----
शेळ्या चोरीस गेलेल्या फिर्यादीस चंकलंबा पोलिस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरक्षक विजय देशमुख यांनी आरोप्याची वागणुक देवुन अकलेचे तारे तोडले आहेत, संबधित अधिकारी हे पोलिस ठाण्यात रुजु झाल्या पासुन ह्या ना त्या कारणा वरून नेहमीच वादग्रस्त राहिले आहेत, त्यामुळे त्यांची तात्काळ चौकशी करावे अशी मागणी होत आहे,
चौकट
पोलिस अधिक्षक साहेब तुम्हीतरी सततच्या घटने कडे लक्ष्य द्या
---------------------------------------- ------
पोलिस अधिक्षक साहेब चंकलंबा पोलिस ठाणे हे नेहमीच वादग्रस्त असुन वाळु तस्करी मुळे चर्चेत राहीले, आहे, या ठाण्यात आरोप्यांना पाठबळ मिळत आसल्याची चर्चा होत आहे, फिर्यादीना हिन वागणुन दिली जात आसल्याने पोलिसांन वरील विश्वहार्तेला कंलक लागत आहे, आता गोरगरिब जनतेचे कैवारी तुम्हीच आहेत, त्यामुळे तात्काळ लक्ष द्या अशी मागणी होत आहे,
COMMENTS