जिल्हा प्रतिनिधी महेंद्र पुरी, हिंगोली
हिंगोली जिल्ह्यातील हट्टा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जवळा बाजार पोलिस चौकिच्या ईमारतीचे नुतनीकरणाचा शुभारंभ गुरूवारी जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी हट्टा पोलिस ठाण्याच्या हद्दीत आत्महत्या केलेल्या शेतकरी यांच्या परिवाराला हट्टा पोलिस ठाण्याचे ठाणेदार गजानन मोरे यांच्या पुढाकाराने दिवाळी निमीत्ताने अन्नधान्य किट व मिठाई चे वाटप करण्यात आले.
तसेच तक्रार निवारण दिनानिमित्त नागरिकांचे तक्रारी चे निरसन स्वतः पोलीस अधीक्षक यांनी केले ,
हट्टा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गावचे, सरपंच, पोलिस पाटिल, प्रतिष्ठित नागरीक यांची मोठ्या संखेने उपस्थिती होती.
यावेळी सपोनि गजानन मोरे यांनी चौकी चे नूतनीकरण करण्यासाठी मदत केलेल्या सर्व व्यापारी , यांचे आभार मानले. तसेच जवळा बाजार येथिल आत्महत्याग्रस्त कुटूंबीयांची सहाय्यक पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांनी भेट घेऊन अडीअडचणी जाणुन घेतल्या.
COMMENTS