मस्साजोग प्रतिनिधी-
स्वानंद सार्वजनिक वाचनालय,आनंदगांव ता.केज जि.बीड येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम वसुदेव(बप्पा)गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. दिनांक ०५-११-२०२० रोजी संत तुकडोजी महाराज पुण्यतिथी व मराठी रंगभुमीदिन ग्ंथवाचन व उत्स्फुर्त भाषण कार्यक्रमातने झाला. यानिमित्ताने बाळासाहेब गायकवाड ,आनंद गायकवाड यांच्यासह बलकांनी ग्रंथवाचन केले.तसेच शालेय विद्याथ्यांसाठी"ग्उत्स्फुर्त भाषण"घेण्यात आले.अध्यक्षस्थानी ग्रंथालयाचे प्रमुख वसुदेव(बप्पा)गायकवाड हे होते.दिनांक ०७-११-२०२० रोजी "विद्यार्थी दिवस"ग्रंदावाचन व ग्रंथप्रदर्शन "कार्य कार्यक्रमातने संपन्न झाला.मुकुंद गायकवाड ,आनंद(भैय्या)गायकवाड ,वसुदेव(बप्पा)गायकवाड यांनी "ग्रंथवाचन"केले.अध्यक्षस्थानी सुनंदा शिंदे या होत्या.ग्रंथप्रदर्शनही मान्यवरांच्या उपस्थितीत घेण्यात आले.दिनांक १४-११-२०२० रोजी पंडीत जवाहरलाल नेहरु जयंती अर्थात "बालदिन""बाल वाचक मेळावा व ग्रंथ वाचन" कार्यक्रमाने साजृरा करण्यात आला.यावेळी आनंद(भैय्या)गायकवाड ,सुनंदा शिंदे,यांनी मार्गदर्शन केले.अध्यक्षस्थानी वसुदेव(बप्पा)गायकवाड हे होते.दिनांक १५-११-२०२० रोजी "बिरसा मुंडा"जयंती साजरी कलाण्यात आली.यावेळी व्याख्यान व चर्चासञ घेण्यात आले.प्रमुक मार्गदर्शन माजी सरपंच रामराजे गायकवाड ,दादा गायकवाड ,गोवर्धन तट,गुरुदेव काशीद यांनी चर्चासञात मार्गदर्शन केले.तर आनंद(भैय्या)गायकवाड यांचे व्याख्यान संपन्न झाले.अध्यक्षस्थानी ग्रथालयाचे प्रमुख वसुदेव(बप्पा)गायकवाड हे होते.
COMMENTS