शिक्षकांची कोविड टेस्ट शाळेतच करावी- प्रा. नितीन कुलकर्णी


 


प्रतिनिधी- 16नोव्हें.


23 नोव्हेंबर पासून राज्यात शाळा सुरू होत असून शिक्षक-शिक्षकेतरांची अनिवार्य केलेली कोविड टेस्ट शाळेत करावी व त्याचा खर्च शासनाने करावा अशी मागणी भाजपा शिक्षक आघाडी मराठवाडा विभागाचे संयोजक प्रा. नितीन कुलकर्णी यांनी केली आहे.


राज्यात शाळा सुरू झाल्यावर करावयाच्या उपाय योजनांबाबत शाळांना सूचना दिल्या असून त्यात शिक्षकांनी कोविड टेस्ट करण्याची सूचना देण्यात आल्या आहेत परंतू सदर टेस्ट चा खर्च कुणी करायचा यावरून संभ्रम निर्माण झाला आहे. विना अनुदानित शाळांमधील शिक्षकांचे वेतन अनेक शाळा प्रशासनाने केले नसून ही महागडी टेस्ट कशी करावी या विवंचनेत शिक्षक असल्याचेही प्रा.नितीन कुलकर्णी यांनी सांगितले. त्यासाठी शासनाने व शालेय शिक्षण विभागाने नियोजन करून शाळांमध्येच विनामूल्य कोविड टेस्ट करून द्यावी अशी मागणी प्रा.नितीन कुलकर्णी यांनी केली आहे.सदर मागणीचे निवेदन राज्याच्या संयोजक आ. प्राध्यापक कल्पना ताई पांडे यांच्या निर्देशानुसार माननीय मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांना पाठविण्यात आले आहे्. सदरील निवेदनावर मराठवाडा विभागाचे सहसंयोजक रामचंद्र भोसले, विजयेंद्र चौधरी, दत्ता पडोळे, सचिन तांबे, ज्योतीताई तुपे, अनिल मोरे , श्री एकनाथ राऊत, यांच्या स्वाक्षरीने पाठविण्यात आले आहे. मराठवाडा विभागातील शिक्षकांचीही याबाबत मागणी जोर धरत असून पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत हा कळीचा मुद्दा ठरणार आहे.


टिप्पण्या