माजलगाव/प्रतिनिधी
राज्य विधान परीषदेच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदवीधर व शिक्षक मतदार संघाची निवडणूकीचे बिगुल वाजले असून ,जो उमेदवार शिक्षकांचे तसेच पदविधरांच्या न्याय प्रश्नाची सोडवणूक करील त्यांनाच कास्ट्राईब बिनशर्त पाठिंबा देऊन विजयी करणार असल्याचे संघटनेने प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
पदवीधर मतदार संघातून मतदार म्हणून,जिल्हा परीषदेच्या प्राथमिक तसेच अनुदानीत/ विनाअनुदानीत, खाजगी शाळांतील शिक्षकांची संख्या फार मोठ्या प्रमाणात असून निर्णायक स्वरूपातील आहे.
या मतदार संघातील उमेदवाराने पुरोगामी विचारसरणीस अनुकूल असे कार्य करणे, शिक्षकांच्या प्रलंबीत प्रश्नांना वाचा फोडणे,जुनी पेंशन योजना कार्यान्वीत करणे,निदेशक व प्रेरक यांना कायम सेवेत सामावून घेणे,अपात कालीन परीस्थीतीत कर्तव्यावर असताना प्राणांची बाजू लावणाऱ्या शिक्षकांना सोयी-सुविधा व राज्य शासनाकडून घोषित विम्याची अदाई तत्काळ होणेसाठी प्रयत्न करणे,पदोन्नतील आरक्षण कायम ठेवण्यासाठी आग्रह धरणे,नव्या राष्ट्रीय शैक्षणीक धोरणात बदल करणे,सुशिक्षित बेरोजगारास नोकरी व बेकारी भत्ता मिळवून देण्यासाठीची भूमिका व कृती कार्यक्रम घोषीत करणे, पदवीधरांसाठी तालुका स्तरावर मोफत व दर्जेदार स्पर्धात्मक परीक्षा मार्गदर्शन केंद्र उभारणे,कृषी विषयक धोरणा संदर्भाने अल्पभूधारक शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणे या व अशा अनेक महत्त्वपूर्ण जिव्हाळ्याच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची हमी व या संदर्भातील भूमिका स्पष्टपणे घेणाऱ्या उमेदवारासच बिनशर्त पाठिंबा देणार असल्याचे कास्ट्राइबचे जिल्हा उपाध्यक्ष भारत टाकणखार, वसंत टाकणखार, तालुकाध्यक्ष
राहूल टाकणखार, सचिव अभिमन्यु इबिते,
किरण शिंदे,निलेश गावडे,रणजित राठोड,नारायण भाळशंकर,अजिमोद्दिन खतीब,मनोहरपंत कटारे,धोंडीराम रामुळे,जीवन डोंगरे,शिवाजी भाळशंकर,किरण माने,सय्यद आयुब,अमित वाघमारे,राजकुमार सोनवणे,नागनाथ पडलवार,विश्वनाथ बेद्रे,प्रतिक स्वामी,नितिन गायसमुद्रे,अभिजित होनवडजकर,प्रविण जाधव,सुमेध घाडगे,शेख असद,बळीराम घनघाव, हनुमंत पांढरपोटे,गोविंद पवार,श्रीकांत जाधव,शंकर पवार,मारोती शहापूरकर,शिवाजी व्यवहारे,चंद्रमनी मगरे,नितीन पुटवाड,
अनिल गावित,शेख मतीन,संदिप वाघमारे,गणेश भदर्गे यानी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
COMMENTS