मा.लो. पक्ष तालुकाध्यक्षपदी यादव वाघमारे यांची बिनविरोध निवड.
==========================
नायगांव प्रतिनिधी.(रामप्रसाद चन्नावार )
...........................................
तळागाळातील उपेक्षित समाजाला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी सातत्याने कार्यशील असलेल्या मानवहित लोकशाही पक्षाची बैठक लसाकमचे रवींद्र भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली असून या पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी यादव मारुती वाघमारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
शहरातील महात्मा फुले कॉलनी येथे सत्यशोधक अण्णाभाऊ साठे सभागृहात मानवहित लोकशाही पक्षाची बैठक आयोजित केली होती. प्रारंभी क्रांतीपिता लहुजी साळवे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सत्यशोधक डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला अभिवादन करून सदर पक्षाचे जिल्हाध्यक्ष के. वाय. देव कांबळे, मालोजीराजे वाघमारे, महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा त्रिशिला रिंगणमोडे, नगराध्यक्ष शरद भालेराव, जिल्हा संपर्कप्रमुख किशन इंगळे यांनी सदर पक्षाच्या ध्येयधोरणाविषयी व भावी वाटचालीसाठी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले, तर या बैठकीत नायगाव तालुका अध्यक्षपदी यादव वाघमारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी लसाकमचे तालुका सचिव भीमराव बैलके, आयोजक प्रल्हाद भंडारे, पक्षाचे विजय भरांडे, अँड. सतीश धनवाडे, बाबू रोडेकर, गजानन गायकवाड, मोहन गायकवाड, सखाहरी घायाळे व विजय इंगळे श्रीमती सागरबाई बोराळे, श्रीमती अंजनाबाई कांबळे आधी जणांनी वाघमारे यांचे अभिनंदन केले आहे.
==========================
नायगाव प्रतिनिधी.(रामप्रसाद चन्नावार )
........................................
इंटरनॅशनल शेतोकांन कराटे असोशियन जपान ऑफ इंडिया च्या वतीने चालत असलेल्या कराटे प्रशिक्षणच्या परीक्षा नुकत्याच एक नोव्हेंबर रोजी संपन्न झाल्याने त्यातील उत्तीर्ण विद्यार्थी विद्यार्थिनीना कराटे कलर बेल्ट व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
शहरातील ग्रीन व्हॅली इंटरनॅशनल स्कूल मध्ये घेण्यात आलेल्या मुख्याध्यापक अशोक पाटील शेळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली वितरण सोहळ्यात बाबाराव महादवाड, किलबिल प्ले स्कूलचे अध्यक्ष संतोष कल्याण, किशोर पांचाळ व आयोजक सेन्साई राजेंद्र कुमार कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांचे स्वागत झाल्यानंतर एकूण 27 मुलांनी विविध बेल्टच्या परीक्षा दिलेल्या व त्यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते कलर बेल्ट व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आलेले श्रीकर सूर्यवंशी, श्रीहर्ष सूर्यवंशी, शशांक शिरोळे, व दुर्गाश्री बैस, नैतिक वाजवी कर, सानवी कल्याण, श्रद्धा कोंकेवाड, ओम साई कोंकेवाड यासह संदेश पवळे, संतोष कोंकेवाड आधी विद्यार्थ्यांनी विविध कलर बेल्ट व प्रमाणपत्र पटकाविले. यावेळी सचिनसिंह तेहरा, प्रदीप जोशी, केशव शिरोळे, संजय वाजवीकर, लक्ष्मण ब्रह्मकर या पालकांची उपस्थिती होती तर संचालन व आभार सेन्साई राजेंद्र कुमार यांनी मानले.
COMMENTS