माजलगाव/भास्कर गिरी
नगरसेवकातून नगराध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया आज 9 नोव्हेंबर रोजी अधिकृत पणे पार पडली.राष्ट्रवादी कडून एकमेव उमेदवारी अर्ज रिंगणात राहिल्यामुळे ओबीसी प्रवर्गाची बनावट टी सी आधारे नगरसेवक झाल्याप्रकरनी 420 चा गुन्हा दाखल असलेले शेख मंजूर शेख चांदसाब हे नगराध्यक्ष म्हणून विराजमान झाले.राष्ट्रवादी च्या गोटात यामुळे आनंदाचे वातावरण आहे.
आज दुपारी 12 वाजता न प च्या सभागृहात नगराध्यक्ष निवडी संदर्भात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले.यात आघाडी चे तलेब चाऊस,प्रताप लाटे,एम आय एम च्या सौ सगीरबी पाशा,भाजप च्या सौ अंजली होके,सौ रेश्मा मेंडके हे नगरसेवक अनुपस्थित होते.केवळ एकच अर्ज उरल्यामुळे शेख मंजूर यांना नगराध्यक्ष म्हणून जाहीर करण्यात आले.यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी श्रीकांत गायकवाड यांनी काम पाहिले.तर सहाय्याक पीठासीन अधिकारी म्हणून मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी सहकार्य केले.पोलीस निरीक्षक धनंजय फटारे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अविनाश राठोड,उपनिरीक्षक विजय थोठे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला.
काय आहे प्रकरण
शहर पोलीस ठाणे गु र न 154/2018 कलम 420,468,471,34 नुसार शेख मंजूर शेख चांदसाब यांच्यावर गट शिक्षण अधिकारी यांच्या फिर्यादीवरून 10 वि च्या टी सी व प्रवेश निर्गम उताऱ्यावर खाडाखोड करून मुस्लिम एबजी मुस्लिम पिंजारी असा बदल केल्या प्रकरणी गुन्हा दाखल असून कोर्टात चार्जशीट दाखल आहे.या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीस आ सोळंके यांनी नगराध्यक्ष पदी विराजमान केले आहे.
COMMENTS