============================
नायगांव प्रतिनीधी
( रामप्रसाद चन्नावार )
........................................
तालुक्यातील मौजे शेळगाव छत्री येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनी कु. शुभांगी मालोजी बैलकवाड हिने शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याने सर्व स्तरातून तिचे तोंड भरून कौतुक करीत अभिनंदन होत आहे.
कुमारी शुभांगी बैलकवाड हिने 2019- 20 वर्षे मधील इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले असून कुमारी शुभांगी हिच्या घरी शैक्षणिक वातावरण नसतानाही आपल्या कोवळ्या वयात हसणे, खेळण्याचे दिवस असले तरी सदर शाळेचे मुख्याध्यापक श्री बाराळे, शिक्षक श्री रामलोड यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले असून शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केलेल्या कुमारी शुभांगी बैलकवाड हिचे कौतुक करीत भावी शैक्षणिक कार्याला शुभेच्छा देऊन स्व. शंकराव पांचाळ गुरुजी कर्मचारी प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी सरपंच सौ. अहिल्याबाई चोंडे, माजी सरपंच संजय पा. आणेराये, विठ्ठल अनेराये, माजी उपसरपंच दत्तराम बैलकवाड, केरबा पा. करखेले, पत्रकार माधव बैलकवाड, पञकार रामप्रसाद चन्नावार . माधव ऐंजपवाड, दिपक भोकरे आधी जणांनी अभिनंदन केले आहे.
COMMENTS