मादळमोही दि, १२ (संतोष भारती):- सध्या पावसाने धुमाकूळ घातल्याने शेतकर्याचे पांढरे सोने समजल्या जाणार्या कपाशी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुसकान झाल्याने बळीराजा धास्तवला आहे,आता तरी तात्काळ सरसकट नुकसान भरपाई देवुन दसरा व दिपावली गोड घास नरड्याच्या खाली उतरु देवा तरच बळीराजा उभा राहु शकतो, कोरोना आजारामुळे धास्तवलेल्या बळीराजा अति पावसाने घाबरळा आहे,त्यामुळे मायबाप सरकारने विनाविलंब सढळ हाताने मदत करावी तरच शेतकरी जगु शकले,
पावसाने कापुस पिकांची अशरक्ष धुळधान केली आहे, गेल्या पंधरवड्यात पावसाने रडकुंडीला अणुन सोडले होतो,त्यातुन सावरुन शेतकरी कसाबसा शेतीतील उद्योग धंदाला लागला होत तोच पुन्हा पावसाने जोराची मुसांडी मारत बळीराजाच्या डोळ्यात पाणी आणल,गेली दोन दिवसापासुन धुवाधार पाऊस पडत आसल्याने कापुस, तुर पिकाचे आतोनात नुकसान झाले आहे, खरीप हंगामातील अत्यंत महत्त्वाचे समाजले जाणारे कापुस पिकाची धुवाधार पावसाने मोठी वाईट आवस्था झाली आहे, हिन्दु धर्मातील महत्वाचा सण म्हणजे दिवाळी दसरा हे सण खरीप हंगामातील पिकाच्या जिवावर बळीराजा आंनदाने साजरा करत आसतो, पण अतिवृष्टी मुळे हे पिके जमिनीवर सडुन गेले आहेत,यामुळे महत्वाच्या सणावर विरजण पडले आहे,अशा आवघड परिस्थिती बळीराजा सावरणे आवश्यक आहे, त्यामुळे मायबाप सरकाराने विलंब न करता भरघोस मदत करत सावरणे गरजेचे आहे ,तरच बळीराजा पुढिल काळात तंग धरेल,व शेती उद्योग टिकेल ,
शेतकर्याला शेती कामाची मजुरी द्या
---------------------------------- ---------
कोरोना काळात अनेकाना नैकरीवर पाणी सोडावे लागले, शहरातील लोक शेतीत येवुन उद्योग करु लागले पण पावसाने कहर केल्याने शेतीचे मोठे हाल होत आहेत,त्यामुळे केंद्र व राज्य सरकाराने शेतकर्यास शेताच्या कामाची मजुरी दिली तरच शेतकरी शेती उद्योग करील नसता बळीराजा संपुष्टात येण्यास विलंब लागणार नाही, त्यासाठी सरकारने पुढे यावे,अशी मागणी होत आहे,
COMMENTS