धर्माबाद (अहमद लड्डा) कोळी राष्ट्रसंघाच्या महिला आघाडीच्या धर्माबाद तालुका अध्यक्षपदी सौ.निर्मला विकी जूगुंलवाड यांची एका नियुक्ती पत्राद्वारे निवड करण्यात आली आहे.
कोळी राष्ट्रसंघाचे संस्थापक अध्यक्ष गोकूळ दादा कोळी यांच्या सुचनेवरून धर्माबाद शहरातील इंदीरानगर येथील रहिवासी सौ.निर्मला विकी जूगुंलवाड यांची कोळी राष्ट्रसंघाच्या धर्माबाद तालुका महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी प्रदेश अध्यक्ष बळीराजे वाघमारे, मराठवाडा अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांनी नियुक्ती केली आहे.सौ.निर्मला विकी जूगुंलवाड ह्या कोळी समाजातील महीलांच्या अडी अडचणी सोडविण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत असल्यामुळे त्यांच्या कार्याची दखल संस्थापक अध्यक्ष गोकूळ दादा कोळी यांनी घेतल्यामुळे सदरील निवड झाल्याचे सांगण्यात आले आहे.सदरील निवडीचे अंसख्य समाज बांधवांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
COMMENTS