माजलगाव ( प्रतिनिधी )- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, आयोजित फेब्रुवारी २०२० मध्ये संपन्न झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत येथील श्री सिध्देश्वर माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी चि.विश्वजित वैजनाथ घायतिडक व हर्षदा नवनाथ घायतिडक यांनी घवघवीत यश संपादन करून शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत.
चि.विश्वजित घायतिडक व कु.हर्षदा घायतिडक यांचे भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ सुरेंद्र आलूरकर, उपाध्यक्ष राधेश्याम लोहिया, कार्यवाह नितीन शेटे, सहकार्यवाह प्रा चंद्रकांत मुळे, डॉ हेमंत वैद्य, श्रीमती कल्पनाताई चौसाळकर, श्री सिध्देश्वर शैक्षणिक संकुलाचे पालक सुनील लोढा,अध्यक्ष प्रकाश दुगड, कार्यवाह अमरनाथ खुर्पे, शालेय समितीचे अध्यक्ष प्रेमकिशोर मानधने, शाळेचे मुख्याध्यापक बाबुराव आडे गुरुजी, उपमुख्याध्यापक निवृत्ती दराडे सर, पर्यवेक्षक उमेश थाटकर, मिलिंद वेडे, दिलीप चव्हाण शिष्यवृत्ती प्रमुख नरेंद्र कोष्टगावकर, राहुल नाईक,अतुल मुगळीकर,मिलींद जोशी,श्रीमती डुकरे,यांनी अभिनंदन केले आहे.
COMMENTS