केज (दिनकर जाधव) : केज तालुक्यातील सारणी (सां) येथील आयु. परी राहुल ओव्हाळ हिचा पहिला वाढदिवस दि.१८ आॕक्टो. रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सद्या मुलींचा वाढदिवस म्हणालं की , तिचे आई-वडिल तो साजरा करण्यास जास्त उत्साही दिसत नाहीत. कारण मुलीकडे पहाण्याचा दृष्टीकोन आजही म्हणावा तेवढा बादललेला पहावयास नाही. या अपवाद मात्र सारणी येथील धारुर आगार येथे वाहक पदावर कार्यरत असलेले राहुल श्रीधर ओव्हाळ ठरले आहेत. कारण त्यांना परी नावाची एक मुलगी आहे. तिचा प्रथम वाढदिवस रविवार दि.१८ आॕक्टो.रोजी मोठ्या उत्साहात साजरा केला. यामध्ये वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या सर्व लहान मुलांना एक वही , पेन व खाऊ देऊन वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी बालासाहेब ठोंबरे , श्रीकांत भांगे , डॉ. चंद्रकांत जाधवर , पद्माकर घोळवे , शंकर जाधव , काका भांगे , गणेश गिरी , अविनाश ढाकणे , दिनकर जाधव , दत्ता क्षिरसागर , आश्रुबा घोळवे , विलास घोळवे यांच्यासह गावातील नागरिक , मित्र , आप्तेष्ट मोठ्या संख्येने हजर होते.
COMMENTS