नांदेड प्रतिनिधी
नांदेड :- सामाजिक चळवळीत अग्रेसर असलेल्या महिला कार्यकर्त्या सारीखाताई चुणुपवाड यांची अखिल भारतीय बहुजन,ओबिसी, अल्पसंख्याक भ्रष्टाचार निर्मूलन असोसिएशनच्या नांदेड जिल्हा महिला अध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.सारीखाताई चुणुपवाड यांचे बहुजन चळवळीत बहुमोल असे योगदान आहे. शासनाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी ते सदैव प्रयत्नरत असतात. त्याचबरोबर,
भ्रष्टाचार निर्मूलनार्थ काम करित असताना जनहितांच्या विविध मागण्यांप्रकरणी त्या प्रसंगी आक्रमकपणे कर्तव्यतत्पर कार्यकर्त्या म्हणून सर्वत्र सुपरिचित आहेत.त्यांच्या कार्याची दखल घेऊन अखिल भारतीय बहुजन,ओबिसी, अल्पसंख्याक भ्रष्टाचार निर्मूलन असोशियशनचे संस्थापक अध्यक्ष सय्यद कलिम मुसा यांच्या आदेशानुसार मराठवाडा अध्यक्ष बाळासाहेब सुरनर पाटील व सौ सोनालीताई हंबर्डे मराठवाडा अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली सारीखाताई चुणुपवाड यांची नांदेड जिल्हा महिला अध्यक्षपदी नियुक्ती करून त्यांना नुकतेच नियुक्ती पञ एका छोट्याखानी कार्यक्रमाप्रसंगी बहाल केले.
सारीखाताई चुणुपवाड यांच्या या निवडीबद्दल सर्वस्तरातून अभिनंदनाचा व कौतुकाचा वर्षाव होत आहे.यावेळी अखिल भारतीय बहुजन ओबीसी अल्पसंख्याक मराठवाडा अध्यक्ष बाळासाहेब सुरणर,अखिल भारतीय बहुजन ओबीसी अल्पसंख्याक भ्रष्टाचार निर्मूलन अशोशीयनचे धर्माबाद तालुका अध्यक्ष चंद्रकांत नागेश्वर, शशीकांत देवकते, पत्रकार शेख आरीफ निमटेककर, नवनियुक्त उमरी युवा तालुका अध्यक्ष प्रविण मठपती,व नायगाव तालुका अध्यक्ष विरभद्र तमनबोईनवाड नागेश गिरबनवाड आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
COMMENTS