*
धर्माबाद (अहमद लड्डा) नायगाव मतदार संघाचे आमदार राजेश पवार व मी जनतेसाठी, जनतेच्या कल्याणासाठी जे काही करीत ते आमचे कर्तव्यच असून पूर्वीच्या लोकप्रतिनिधींनी आजतागायत काहीच कामे केले नाहीत, आम्ही आमच्यकडुन अपेक्षित असलेले काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करित आहोत, आमदार व लोकप्रतिनीधी कसा मतदारसंघाचे पालकत्व काय असते हेच भविष्यात दाखवायचे आहे. असे प्रांजळ प्रतिपादन आमदार राजेश पवार यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्या सौ पुनमताई पवार यांनी तालुक्यातील नायगाव (ध) येथे केले. केंद्र सरकार ने पारित केलेल्या नविन कृषि विधयका चे महत्व शेतकऱ्यांना समजवन्यासाठी शेत शिवार भेट व त्या अनुषंगाने शेतकऱ्याची सुसंवाद साधणे या धरतीवर त्यांनी काल धर्माबाद तालुक्यातील अनेक गावांना भेटी दिल्या. मौजे विळेगाव व बेल्लूर येथे भारताचे पंतप्रधान श्री नरेन्द्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित आयोजित सेवा सप्ताह अंतर्गत नुकतेच नेत्र रोग निदान शिबिर घेण्यात आले होते, तेथे चष्मे वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला, तसेच नायगांव (ध) येथे शिवार भेटी चा कार्यक्रम झाला, ह्याठिकाणी सौ. पुनमताई पवार यांनी कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांन समवेत बसुन पिटल.. भाकरीचा आस्वाद घेतला व चश्मे वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला . ह्यावेळी भाजपाचे माजी तालुकाअध्यक्ष विजय पाटील डांगे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रमेश गौड व अशोक वडजे,माजी नगरसेवक गंगाधर गौड, हिंदू युवा संघटनेचे सतीश मोटकूल, कार्यकर्ते नारायण पाटील पवार,शंकर पाटील कदम, मेघनाथ पवार, माधव गाडे,सज्जन गद्दोड,अमित मूंदडा ,नानकसिंग ढिल्लो,गिरीधर बुंदेले, साईनाथ पंजेवाड , बालाजी सावरगावे, रामराव कदम,सोशल मिडिया प्रमुख साईनाथ शिरपुरे,गोवर्धन नरवाडे,भोजमोड़,सोमठाने,
भीमराव लव्हाळे आणि मंगळूरे पाटील चिंचोलीकर,सह शेकडो कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते.
सर्वसामान्य जनतेला त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी व त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन ती अडचण सोडवण्यासाठी आमदार श्री राजेश पवार व सौ.पूनमताई पूर्णवेळ जनसेवेचे कार्य करीत आहेत, त्यांनी हाती घेतलेला जनसेवेचा वसा चालू ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू या पुढेही हे कार्य चालूच राहील. अशी प्रतिक्रिया यावेळी भाजपचे विजय पाटील डांगे यांनी दिली.
COMMENTS