नांदेड (विठ्ठल कल्याणपाड )
मुखेड तालुक्यात आज राज्याचे मदत व पुनवर्सन मंञी विजय वडेटीवार हे आले असता सलगरा शिवारात शेतीचे पाहणी करीत असताना अचानक शेतकरी पुञ बालाजी पाटील ढोसणे,बालाजी पाटील सांगवीकर,माधव पा.खदगावे,रमाकांत पाटील जाहुरकर यांच्या नेतृत्वाखाली आज विजय वड्डेटीवार यांच्या समोर शेतकरी पुञानी "बंद करा...बंद करा..पाहणी दौरे बंद करा,मदतमंञी मदत करा पाहणी दौरे बंद करा या घोषणेने परीसर दणाणुन सोडले यावेळी शेतकरी पुञांनी मुखेड तालुका ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकर्यांना तात्काळ मदत देण्याची मागणी व शेतकर्यांच्या पोरावर सेंट्रल बँक आँफ इंडीयाच्या शाखा मँनेजरने खोटा गुन्हा दाखल मागे घेण्यात यावा या मागणीचे मंञ्याना निवेदन सादर केले.यावेळी बालाजी पाटील ढोसणे यांनी मुक्रामाबाद बार्हाळी सर्कलला पाझर तलाव फुटून हजारो एकर शेतीचे नुकसान झाले यावर कुणीही लक्ष देण्यास तयार नाहीत यावर मदत व पुनवर्सन मंञी यांनी मदत देवु असे ऊत्तर दिले त्यावर ढोसणे यांनी कर्ज काढा पण शेतकर्यांना मदत करा अशी मागणी विजय वड्डेटीवार यांच्या कडे केली. यावेळी पांडुरंग पाटील मसलगेकर,अंकुश पा.लुटे,निळकंठ पाटील चांडोळकर,शिवराज पाटील सलगरकर आदी शेतकरी ऊपस्थितीत होते.
- *वड्डेटीवारच्या दौर्यानिमित्त शेतकरी पुञाची घेतली प्रशासनाने धसकी*
- आज मदत व पुनवर्सन मंञी विजय वडेटीवार यांच्या दौर्या निमित्त मागच्या वेळी राज्याचे कृषि मंञी दादाजी भुसे यांचा ताफा शेतकरी पुञ बालाजी पाटील ढोसणे,बालाजी पाटील सांगवीकर,माधव खदगावे,रमाकांत पाटील जाहुरकर यांनी अडवल्याने या दौर्यांची प्रशासनाने चांगलीच धसकी घेतल्याचे दिसत होते.
COMMENTS