राम दातीर
माहूर (प्रतिनिधी )' कालरात्रि ' या स्वरूपा मध्ये आवाहन करून वैदिक मंत्रोच्चारात व षोडशोपचारात सहस्त्र नामावलीने कुंकुम अर्चन करून श्री रेणुका मातेची पूजा संपन्न करण्यात आली.प्रमुख अर्चक चंद्रकांत रिठे,वेद पाठ शाळेचे गुरुजी निलेश केदार व त्यांच्या सहाय्यकांनी भक्त कल्याणार्थ सप्तशप्ती पाठ व श्रीसूक्ताचे आवर्तन रेणुका चरणी समर्पित केल्या नंतर देवीच्या शास्त्रा मध्ये सांगितल्या प्रमाणे शारदीय नवरात्र महोत्सवाच्या सप्तमीला कन्या व सुवासिनी पूजनाला अनन्यसाधारण महत्व असल्याने आज दि.23 ऑक्टो.रोजी 11 वाजता सचिव तथा उपविगिय महसुल अधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी 11कुमारीका व एका सूवासिनिचे सपत्नीक पूजन केले.
भारतवर्षा मध्ये स्त्री,माता व कुमारीका पूजनाची अनादि काळा पासून परंपरा आहे. रेणुका गडावरही अविरतपणे ती परंपरा पळाल्या जाते.या प्रसंगी विश्वस्त चंद्रकांत भोपी,संजय काण्णव,विनायक फांदाडे, अरविंद देव,आशीष जोशी,दुर्गादास भोपी,बालाजी जगत पुजारी रविंद्र काण्णव, भवानीदास भोपी,संतोष जोशी,शुभम भोपी व श्रीमती कृतीका वरणगांवकर यांचेसह अनेकांची उपस्थिती होती.यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करण्यात आले.स्थानिक पेंटर सुरेश आराध्ये यांनी मंदिराच्या प्रांगणात ' बेटी बचाव,बेटी पढाव ' हा संदेश देणारी र साकारलेल्या रांगोळीची उपविभागिय महसूल अधिकारी पुजार यांनी मुक्त कंठाने प्रशंसा केली.
जगातून कोरोना महामारीचे भय नष्ट होवो,देश सुखी,समाधानी होवो,मुलींना योग्य शिक्षणाची संधी लाभो, त्यांची उतरोत्तर प्रगती होवो.अशी प्रार्थना केल्याची भावना सचिव तथा उपविभागिय महसूल अधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी आमच्या प्रतिनिधीशी जवळ व्यक्त केली.
COMMENTS