माजलगाव/प्रतिनिधी
भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित श्री सिद्धेश्वर महाविद्यालय माजलगाव, यांना विद्यापीठ अनुदान आयोग दिल्ली यांच्या राष्ट्रीय कौशल्य विकास अंतर्गत विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी एनएसक्यूएफच्या 5 प्रमाणपत्र कोर्सेसना मान्यता मिळालेली आहे. यामध्ये रसायनशास्त्र विभागास एग्रीकल्चर केमिस्ट्री, इंग्रजी विभागास कम्युनिकेशन स्किल्स फॉर बिझनेस अँड मार्केटिंग, अर्थशास्त्र व संगणक शास्त्र विभागास बँकिंग अँड सायबर क्राईम, वनस्पतीशास्त्र विभागास मशरूम कल्टिवेशन, आणि वाणिज्य विभागास अकाउंटन्सी अशा सहा महिनेसाठी चालविल्या जाणाऱ्या प्रमाणपत्र कोर्सेससाठी मान्यता मिळालेली आहे. या कोर्सला बारावी उत्तीर्ण झालेला कोणताही विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतो. विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी श्री सिद्धेश्वर महाविद्यालय नेहमी तत्पर असते. विद्यार्थ्यांना वरीलपैकी जे कौशल्य प्राप्त करायचे आहे त्या कोर्सेसला विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित करून घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ. भालचंद्र कराड उपप्राचार्य डॉ गजानन होन्ना व प्रा.युवराज मुळ्ये यांनी केले आहे. या कोर्ससाठी नोडल ऑफिसर डॉ. कमलकिशोर लड्डा समन्वयक डॉ. विकास बोरगावकर , डॉ. महेश देशमुख,डॉ. सचिन दाभाडे डॉ. प्रेमनंदा घडसिंग व प्रा.अशोक होके हे विषय प्रमुख म्हणून कार्य करणार आहेत.
या महाविद्यालयास हे प्रमाणपत्र कोर्सेस मिळाल्याबद्दल संस्थाध्यक्ष डॉ.सुरेंद्र आलुरकर ,कार्यवाह नितीन शेटे, उपाध्यक्ष राधेश्याम लोहिया, प्रकाश दुगड
,अमरनाथ खुर्पे, अभय कोकड या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
COMMENTS