धर्माबाद (अहमद लड्डा) गुरुकुल विद्यालय धर्माबाद येथील विद्यार्थीनींनी 2020 मध्ये पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. पूर्ण धर्माबाद तालुक्यात ह्या विद्यार्थीनींचे कौतुक होत आहे. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता आठवी ची कु.जंगमे सिद्धी विश्वंभरने हिने 230 गुण घेऊन तर कु.जंगमे रिद्धी विश्वंभरने 200 गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला. या दोन्ही जुळ्या बहिणी शिष्यवृत्तीस पात्र झाल्या असून. त्यानी आपल्या यशाचे श्रेय शाळेतील सर्व शिक्षक आणि आई यांना दिले आहे. त्याची आई श्रीमती अनुसया नानाभाऊ मुळे ह्या करखेली च्या गौतमी विद्यालयात शिक्षिका आहेत. ह्या जुळ्या बहिणीना त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले आहे. आणखी एक बाब म्हणजे या दोन्ही जुळ्या बहिणी दिसायला जवळपास एकसारख्या आहेत. आतापर्यंत ह्या विद्यार्थीनींना शालेय स्पर्धा परीक्षा मध्ये बरेच पारितोषिक मिळालेले आहेत. उच्च शिक्षण घेऊन चांगल्या मोठ्या पदावर काम करण्याची इच्छा ह्या विद्यार्थीनींनी आमच्या वार्ताहाराजवळ बोलून दाखविली.
COMMENTS