नायगांव ( प्रतिनिधी )
नांदेड ते हैद्राबाद राज्यमहामार्गावर असलेल्या मयदा कंपनी जवळ एका ९० वर्षीय वयोवृद्ध अनोखी इसम दिनांक ११ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी दहा ते आकारा वाजण्याच्या दरम्यान सदर इसम घुंगराळ्याकडे जात असताना वाटेतच पाऊस लागल्यामुळे व भुकेने व्याकुळ झाल्यामुळे चालणे होत नसल्याने सततधार पावसात अंगात कपड्याविना राज्यमहामार्गावर कुडकुडत संध्याकाळी सहा वाजे पर्यंत राहिला आहे
कुंटूर पोलिसांना सदरची खबर मिळाल्याने ठाण्याचे सपोनि के एस पठाण यांच्या मार्ग दर्शनाखाली बीट जेमादार कुमरे , पॉका घूमे यांनी तत्काळ घटनेच्या ठिकाणी जावून सदर इसमाची पाहणी केली असता तो वयोवृद्ध राज्यमहामार्गावर कुडकुडत असल्याने त्याला घुंगराळा येथे जावून एक शाल , एक लुंगी आणून अंगावर टाकले आहे
नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यामुळे येथील डॉक्टरानी योग्य उपचार चालू केला असल्याचे पॉका घूमे यांनी सांगितले वेगवेगळ्या कंपन्यात काम करणारे मजूर ही यावेळी मदत केली असून घुंगराळा येथील एक ऑटो चालक माधव यांनी मोफत नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी घेवून गेले आहे
सदरच्या इसमास जीवदान देणाऱ्या कुंटूर पोलिसांना जनतेचा सलाम केला जात असून पोलिसाचे जनतेतून कौतुक ही केले सदरचा अनोळखी इसम हा कुठला रहिवासी व कोठून आला यांचा ठिकाणा नसल्याने राज्यमहामार्गावरच फिरत राहत होता परंतु तो एडसर आहे.
COMMENTS