पूनम ताई यांची उपस्तिथी
धर्माबाद (सरफ़राज़ अहमद) धर्माबाद तालुक्यातील विलेगाव, बेल्लूर व नायगाव येथे शेत शिवार भेट व शेतकरी संवाद कार्यक्रम सम्पन्न झाला. ह्यासाठी भाजपाच्या प्रदेश सरचिटणीस महिला मोर्चा व जिल्हा परिषद सदस्या सौ पूनमताई पवार यांची उपस्थिती लाभली.धर्माबाद तालुक्यातील विलेगाव, बेल्लूर आणि नायगाव या गावात शेतकरी संवाद कार्यक्रम घेण्यात आला.येथे त्यांनी गरजूंना चष्म्याचे वाटप केले. या कार्यक्रमापूर्वी त्यांनी येथे शेतकऱ्यांशी विविध विषयावर चर्चा केली. पंतप्रधानांनी शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या योजनांची माहिती दिली. ह्या कार्यक्रमासाठी संचालक रमेश गौड, अशोक वडजे, माजी नगरसेवक गंगाधर गौड, भाजपाचे माजी तालुका प्रमुख विजय डांगे, हिंदू युवा संघटनेचे सतीश मोटकुल, भाजपा कार्यकर्ते अमित मुंदडा, यल्लप्पा अक्कलवार, सोशल मीडिया प्रमुख साईनाथ शिरपुरे, नारायण पाटील पवार, ज्येष्ठ पत्रकार संजय कदम, लक्ष्मण तुरेराव, गंगाधर आलूरोड, सरपंच सदानपोड, नारायण पा. पवार,शंकर पा. कदम,मेघनाथ पवार,माधव गाडे, साईनाथ पंजेवाड,बालाजी सावरगावे आणि रामराव कदम उपस्थित होते. विजय डांगे यांनी कार्यक्रमात आपले विचार मांडले. शिवराज गाडीवान यांनी मनोगत व्यक्त केले आणि आभार सरपंच सदानपोड यांनी मानले.ह्या कार्यक्रमासाठी गावातील सर्व नागरिक व शेतकरी उपस्थित होते.
COMMENTS