माजी आ.आर.टी.देशमुख यांचा गोडबोलून माजलगाव वर पुन्हा डोळा - परत गोड बोलून नागरिकांना करणार जवळीकता

?   माजलगाव/भास्कर गिरी      2009, 2014 ला आपल्या गोडबोलेपणामुळे माजलगाव पंचक्रोशीत प्रसिद्धी पावलेले.2014 ते 19 मध्ये माजलगाव तालुक्यातील ...

?


 


माजलगाव/भास्कर गिरी


     2009, 2014 ला आपल्या गोडबोलेपणामुळे माजलगाव पंचक्रोशीत प्रसिद्धी पावलेले.2014 ते 19 मध्ये माजलगाव तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांला देशोधडीला लावले माजी आ.आर.टी.देशमुख यांचा माजलगाव च्या लोण्याच्या गोळ्यावर परत डोळा असून माजलगाव मध्ये परत बस्तान बसवण्याचा हालचाली सुरू आहेत.


          माजी आ. आर टी देशमुख यांनी विधानसभा ची निवडणूक लढवण्यासाठी माजलगाव मतदारसंघात आगमन केले आणि 2009 ची निवडणूक लढवण्यासाठी माजी आ. राधकीसन होके पाटील यांना सोबत घेऊन माजलगाव मतदारसंघ संपूर्ण पिंजून काढला मा. आ. देशमुख मतदाराला आपल्या गोड शैलीतून प्रत्येक गावात मतादारांना बोलत होते की, भाजप कडून कोणाला ही विधानसभेचे तिकीट मिळू मला किंवा अण्णा ला परंतु विजय भाजपचाच व्हावा असे म्हणत ऐनवेळी मा. आ. राधाकृष्ण होके पाटील यांच्या डोक्यात धोंडा घालत 2009 मध्ये स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या कडून विधांनसभेचे तिकीट पदरात पाडून घेतले होते. मा. आ. होके पाटील यांना तिकीट नाकारल्याने नाराज झाले आणि कुठेच न जाता होके पाटील शांत राहिले आणि 2009 मध्ये आमदार प्रकाश सोळंके आणि मा. आ. देशमुख यांच्यात फाईट झाली अन देशमुख यांचा पराभव झाला. भाजपच्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून आ देशमुख माजलगाव मतदारसंघ सोडून गेले परत गोड शैलीची भाषा वापरून 2014 मध्ये माजलगाव विधानसभा मतदारसंघात दाखल झाले आणि माजलगाव विधानसभेचे आमदार झाले. 


          2019 ची निवडणूक आजार पणामुळे न लढवल्यामुळे वर्षभर आराम करून माजी आ. आर टी देशमुखांची माजलगाव मतदारसंघात येण्याची लगबग सुरू झाली असल्याने दासऱ्याचे मुहूर्त पाहून माजलगाव मतदारसंघात प्रवेश करणार असल्याचे नागरिकांत बोलले जात आहे. 


         2019 च्या अगोदर पासूनच मा. आ. देशमुख यांची तब्येत साथ देत नव्हती तरी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी होतीच परंतु 2019 मध्ये देशमुखांना डावलून रमेश आडसकर यांना विधानसभेचे तिकीट दिले आणि सोळंके, आडसकर यांच्यात फाईट झाली यात आडसकर यांचा आ सोळंके यांनी जवळून पराभव केला आडसकर यांचा पराभव झाला पण ते मा. आ. देशमुख यांच्या सारखे भाजप कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून अडसाला जाऊन थांबले नाही तर लगेच माजलगाव मतदारसंघात येऊन मतदाराचे आभार व्यक्त केले. 2019 च्या निवडणुकीत रमेश आडसकर यांचा पराभव झाला तरी त्यांनी मतदारांच्या व कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेऊन जोमाने पक्षाच्या कामाला लागले.आडसकर हे आता माजलगाव भाजप साठी तारणहार ठरण्याची शक्यता असताना अचानक अधीक मास चा मुहूर्त साधत माजी आ आर टी देशमुख यांनी माजलगाव प्रवेशाचा मुहूर्त साधला.आपल्या माजलगाव येथील बंगल्याची साफसफाई सुरू केली असून दसऱ्याला सहपरिवार माजलगाव मध्ये बस्तान बसवण्याच्या दृष्टीने सीमोल्लंघन करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. माजलगाव शहराचे केलेले वाटोळे कमी आहे की काय कोणास ठाऊक ? ते देशमुख परत माजलगावला येत आहेत.कृउबा निवडणूक,नगरपरिषद, जी प पस,ला कार्यकर्त्यांना देशोधडीला लावणाऱ्या आ देशमुखांनी माजलगाव मध्ये पाय ठेवू नये असे भाजप कार्यकर्ता खाजगीत बोलत आहे.


COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group