धर्माबाद (अहमद लड्डा)
धर्माबाद चे उद्योजक तथा आडत व्यापारी असोसिएशनचे नांदेड जिल्हाध्यक्ष सुबोध काकाणी यांच्या वाढदिवसानिमित्त धर्माबाद चे पत्रकार सतिष पाटील शिंदे यांनी लिहिलेल्या कार्यआढावा या पुस्तकाचे जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले आहे.
एक व्यावसायिक ते यशस्वी उद्योजक, व्यापारी व शेतकरी यांच्यात योग्य समन्वय ठेऊन धर्माबाद चे व्यावसायिक वैभव राज्यभरात वाढवीत हजारो जणांना रोजगार उपलब्ध करून दिला.तसेच ना नफा ,ना तोटा या धर्तीवर कार्डियाक रुग्णवाहिका, अग्निशमन दलाचे वाहन,स्वर्गरथ,शीतशव पेटी आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी जिल्ह्यातील सर्वात मोठे वेअर हौउस ,कोल्डस्टोरेज आदीची उभारणी केली आहे.आतापर्यंत या माध्यमातून 10 हजारपेक्षा आधिक शेतकऱ्यांना याचा आधार मिळाला आहे.उद्योजक सुबोध काकाणी यांच्या या कार्य आढावा पुस्तकाचे जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
यावेळी धर्माबाद पत्रकार संघाचे अध्यक्ष बाबुराव पाटील, भूसंपादन उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, काकाणी परिवारातील सदस्य म्हणून डॉ. भरत तोष्णीवाल, डॉ. शोभा तोष्णीवाल आदींची उपस्थिती होती.
COMMENTS