प्रतिनिधी / केज
दारूच्या नशेत एका ४० वर्षीय इसमाने विषारी औषध प्राशन केल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यूची झाल्याची घटना केज तालुक्यातील आरणगाव येथे घडली. आश्रूबा नवनाथ सिरसट असे या आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे.
आरणगाव येथील आश्रूबा नवनाथ सिरसट ( वय ४० ) यांनी दारूच्या नशेत २ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.१५ वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या विषारी औषध प्राशन केले. त्यांना उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान आश्रुबा सिरसट यांचा मृत्यू झाला. चार ऑक्टोबर रोजी सुधाकर नवनाथ सिरसट यांनी दिलेल्या खबरेवरून केज पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलीस नाईक अमोल गायकवाड हे पुढील तपास करत आहेत.
addComments
टिप्पणी पोस्ट करा