---------------------------------------------------
केज प्रतिनिधी :- केज तालुक्यातील कानडी माळी येथे दोन करंट्या मुलांनी पैशासाठी आपल्या जन्मदात्या आईला पेट्रोल टाकून जिवंत जाळून मारण्याचा प्रयत्न केला परंतु गावातील लोकांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला
या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील चिंचोली कानडी माळी येथील इंदुबाई कुचेकर यांची पती लालासाहेब कुचेकर हे पोलिस सेवेत होते. काही वर्षांपूर्वी ते बेपत्ता झाले आणि त्यामुळे त्यांना मयत घोषित करण्यात आले होते. लालासाहेब कुचेकर यांच्या पश्चात वारस म्हणून त्यांची पत्नी इंदुबाई कुचेकर हिस भविष्य निर्वाह भत्ता व त्यांच्या खात्यावरील जमा असे एकूण ९ लाख रुपये तिच्या खात्यावर जमा होते. त्यातील बरीचशी रक्कम तिने आपली
दोन्ही मुले संतोष कुचेकर व नितीन कुचेकर या मुलांना दिली. त्या नंतर तिच्या खात्यावर असलेली ४ लाख ८४ हजार रुपये आम्हाला दे म्हणून त्यांचा सारखा तगादा होता. त्यातून ते दोन्ही मुले संतोष व सचिन हे दोघे संगणमत करून आपल्या आईशी सतत भांडण करीत होते. दि ३ ऑक्टोबर रोजी संतोष कुचेकर व सचिन कुचेकर या दोघांनी आपली जन्मदाती आई इंदुबाई कुचेकर हिस आम्हाला तुझ्या नावावर असलेलेभविष्य निर्वाह निधीतील पैसे का देत नाहीस म्हणून भांडण केले. आणि कानडी माळी येथे रात्री ७:०० वाजता शिवाजी रघुनाथ राऊत यांच्या पाण्याच्या जारच्या दुकानासमोर इंदुबाई हिच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून मारण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या ठिकाणी उपस्थित असणारे गावातील नागरिक यांच्यामुळे तो अनर्थ टळला. या प्रकरणी इंदुबाई कुचेकर हिच्या तक्रारीनुसार पोलीस स्टेशनला गु.रं.न. ४२२/२०२० भा.द.वि. ४०७ व ३४ नुसार संतोष कुचेकर आणि सचिन कुचेकर या दोन्ही आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.घटनेचे गांभीर्य पाहता प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे यांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांना दि. ६ ऑक्टोबर पर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
---------
COMMENTS