माहूर (प्रतिनिधी )भारतीय जनता पक्ष महीला मोर्चाच्या शहराध्यक्ष पदी अर्चना राजू दराडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दि.22 ऑक्टो.रोजी नांदेड येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात जिल्हा आघाडीच्या अध्यक्षा चित्रलेखा गोरे यांच्या स्वाक्षरीचे नियुक्ती पत्र खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे हस्ते त्यांना देण्यात आले.
खा.चिखलीकर यांच्या संपर्क कार्यालयात भाजपा ग्रामिण जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, महानराध्यक्ष प्रविण साले,आ.राम पाटील रातोळीकर,आ.तुषार राठोड आ.भिमराव केराम,जिल्हा सरचिटणीस गंगाधर जोशी, युवा मोर्चाचे अध्यक्ष किशोर देशमुख, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष संजय पाटील घोगरे,ओबिसी सेलचे जिल्हाध्यक्ष बाबुराव केंद्रे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा चित्ररेखा गोरे,ओबीसी आघाडीचे प्रदेश सदस्य माणिकराव लोहगावे, जिल्हा सरचिटणीस श्रावण पाटील भिलवंडे, लक्ष्यण ठक्करवाड, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रवी पाटील खतगांवकर, उद्योग आघाडीचे महानगराध्यक्ष शैलेश कराळे, भाजपाचे योगी श्यामबापु भारती महाराज , भाजपाचे युवानेते अॅड रमण जायेभाये यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमात अर्चना राजू दराडे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
माहूरचे योगी शामबापु भारती महाराज,युवा नेते अॅड.रमण जायभाये,तालुकाध्यक्ष अॅड.दिनेश येऊतकर,द पॉवर ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष विजय आमले,ज्येष्ठ पत्रकार वसंत कपाटे,नंदकुमार जोशी,राम दातीर,पवन कोंडे यांचेसह अनेकांनी त्यांच्या नियुक्तीचे स्वागत करून भावी कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
COMMENTS