जागतिक पोलिओ दिनानिमित्त वडवणीत रोटरी क्लबच्या वतीने कार रॅली

.   वडवणी /जगदीश गोरे   २४ ऑक्टोबर हा जागतिक पोलिओ दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो यानिमित्त शनिवारी सकाळी रोटरी क्लब ऑफ वडवणी यांच्या वती...

.


 


वडवणी /जगदीश गोरे


 


२४ ऑक्टोबर हा जागतिक पोलिओ दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो यानिमित्त शनिवारी सकाळी रोटरी क्लब ऑफ वडवणी यांच्या वतीने कार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.


पोलिओ या आजाराचे संपूर्ण जगातून समूळ उच्चाटन करणे व या आजाराबद्दल समाजामध्ये जागरूकता आणणे हे महत्त्वपूर्ण उद्दिष्ट रोटरी क्लबने डोळ्यासमोर ठेवून जगभरात मोहीम हाती घेतलेली आहे. शनिवारी सकाळी नऊ वाजता आनंद मंगल कार्यालय येथून कार रॅली चालू झाली. शहरातील सर्व चौका-चौकात पोलिओ निर्मूलन बद्दल स्पिकरद्वारे जनजागृती करत साडेनऊ  वाजेपर्यंत रेणुका माता मंदिर येथे रॅलीचा समारोप झाला. जगातून पोलिओचे समूळ उच्चाटन करण्यामध्ये लहान मुलांना दोन थेंब डोसचे दिले जातात. हे करण्यात रोटरी क्लबचा सिंहाचा वाटा आहे. या रॅलीचे प्रोजेक्ट चेअरमन डॉक्टर जगदीश टकले व चंद्रकांत करांडे हे होते. या रॅलीत संस्थापक चेअरमन डाॅ.भाऊसाहेब पुर्भे, विद्यमान अध्यक्ष डॉ. विजयकुमार निपटे, सेक्रेटरी माधव पुरी, अॅड.श्रीराम लंगे, जेष्ठ पञकार सुभाषराव वाव्हळ, अशोक निपटे, अनिल वाघमारे, महेश मुंडे, डाॅ. दिनकर बोंगाने, डाॅ. जगदीश टकले, भंडारे, तात्या शिंदे, वचिष्ठ शेंडगे, चंद्रकांत करांडे, डाॅ. थोटे, दुटाळ महाराज, नवले, डाॅ. रविंद्र मुंडे, संतोष गोंडे, आदी रोटरी क्लब वडवणीचे सर्व  सदस्यांनी मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला.



COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel