महेंद्र पुरी, जिल्हा प्रतिनिधी, हिंगोली
हिंगोली राज्य राखिव पोलिस बलगट क्रमांक 12 चे समादेशक आयपिएस मंचक ईप्पर यांची नुकतीच पुणे येथे बदली झाली आहे. पुणे येथे पिंपरी चिंचवड च्या पोलिस उपायुक्त पदी त्यांची नियुक्ती झाली आहे.
मंचक ईप्पर यांनी हिंगोली समादेशक पदाच्या दिड वर्षाच्या कार्यकाळामधे बलगट क्रमांक 12 मधील जवानांन मध्ये स्फूर्तीचे वातावरण निर्माण करून विविध उपक्रम राबवीले. ज्यामधे परिसरात पंधरा हजार वृक्षांची लागवड करीत हे वृक्ष संगोपनासाठी अधिकारी कर्मचारी यांना दत्तक देऊन संवर्धनाची जबाबदारी दिली होती.ज्यामुळे सद्दस्थितीत बारा हजार वृक्ष जिवंत आहेत. तसेच जिल्ह्यात जेंव्हा ही रक्ताचा तुटवडा भासला तेंव्हा मंचक ईप्पर यांनी पुढाकार घेऊन रक्तदान शिबीराचे आयोजन केले कोरोणा महामारीच्या काळात जिल्हा सामान्य रूग्णालयात रक्ताचा तुटवडा असल्याने रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते.आता पर्यंत त्यांनी त्यांच्या दिड वर्षाच्या कार्यकाळात चार वेळा रक्तदान शिबीर घेतले. बल गटातील कर्मचारी यांना चोविस तास ड्युटीचा ताण असल्याने त्यांच्या परिवारातील व्यक्ती ना काही समस्या अडचण निर्माण झाल्यास ती तात्काळ सोडविण्यासाठी गटातील अधिकारी कर्मचारी यांचे वाटसप ग्रुप तयार करून बाहेर गडचिरोली सारख्या ठिकाणी बंदोबस्तात असलेल्या कर्मचारी याला समस्या निर्माण झाल्यास ग्रुपला मँसेज टाकताच समस्यांचा तात्काळ निपटारा केला. गटामधे दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याची समस्या निर्माण होत होती ईप्पर यांनी पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन करून टँकर मुक्त केले. घणकचरा व्यवस्थापण करून खत निर्मिती केली. तसेच कर्मचारीयांच्या मुलांना कोचींग क्लासेस, महिलांना शिवनकाम, ब्युटीपार्लर सारख्या उद्योगाचे प्रशिक्षण केंद्र स्थापन केले होते. यासह विविध सामाजीक उपक्रम त्यांनी राबविले कोरोना महामारीच्या काळात बाहेर बंदोबस्तावरून परतलेल्या व कोरोना ची लागन झालेल्या अधिकारी कर्मचारी यांचे योग्य नियोजन करून जेवन व राहण्याची व्यवस्था करून आरोग्याची काळजी घेतली. तसेच मुंबई येथे आयोजित 42 किमी मँरेथाँन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळून महाराष्ट्रात हिंगोलीचे नाव उंचावले होते.यावेळी त्यांचा राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या हस्ते गौरव करण्यात आला होता. अशा कर्तबगार आयपिएस अधिकार्याला ग्लोबल मराठवाडा चा सलाम.पुढिल कार्यास शुभेच्छा 💐🌹🌹💐
COMMENTS