आष्टी (दादासाहेब बन)
शिराळ या राजकीय चर्चेत असणाऱ्या गावातील राजकीय ,सामाजिक कार्याचा वारसा असणाऱ्या आजबे कुंटुंबात जन्मलेले संजयदादा शञुघ्न आजबे या तरुणाने दुग्धव्यावसात चिकाटीने चांगले काम केले. शिराळ व आष्टी येथे खाजगी दुध संकलन केंद्र चालविले.दुधउत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव दिला.शेती व शेतीसंबधीत शेती औजारे ,सबमर्शीबल कृषी पंप,पाईप,कडबा कुट्टी आदि मशिनरी विक्री होणार आहे.कोणत्याही व्यावसायात कोणाचीही मक्तेदारी नसते हे संजयने सिध्द केले आहे.उद्योग व्यावसायातही आजबे आहेत आता हा व्यावसाय करताना योग्य व माफक दरात शेतकऱ्यांना औजारे द्यावेत असे आवाहन आ.सुरेश धस आणि माजी आ.भीमराव धोंडे केले.
आष्टी येथील गणपती चौकात नगर रोडवर आंजली मशीनरी या दुकानाचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.दुकानाचे उद् घाटन भीमराव धोंडे यांच्या हस्ते फित कापुन झाले. अध्यक्षस्थानी आ.सुरेश धस हे होते. यावेळी संदीप खाकाळ,शञुघ्न आजबे,सागर दरेकर,शाम धस ,बबलु तांबोळी,यशवंत खंडागळे,अशोक ढवण ,नगराध्यक्ष भारत मुरकुटे,सरपंच अतुल कोठुळे,गौतम आजबे,गोरक्ष तावरे,डाॕ.सुनिल गाडे,शंकर देशमुख,उत्तम बोडखे ,दादा बन,दिपक खिळे,गंगाधर पडवळे ,
रामशेठ मधुरकर,बंडुआबा आजबे,दिपक सोनवणे ,जालींदर पोकळे,कैलास भगत आदि मान्यवर उपस्थित होते.प्रस्तावीक संदीप खाकाळ यांनी केले तर संचलन व आभार पंचायत समिती सदस्य यशवंत खंडागळे यांनी मानले.
*********************
COMMENTS