आष्टी (दादासाहेब बन )
आष्टी शहरातील होलसेल राकेल विक्रेते म्हणून सर्व परिचित असलेले व्यापारी रवी कुमार मेहेर हे गेल्या 23 वर्षापासून आपल्या वाढदिवसानिमित्त रक्तदान करीत आले असून आज त्यांच्या 48 व्या वाढदिवसानिमित्त ईदगाह मैदान येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करून 48 वा वाढदिवस साजरा केला आहे .
आष्टी शहरातील होलसेल राँकेल विक्रेते म्हणून रवी शेठ मेहेर यांची ओळख निर्माण झाली असून त्यांनी हे काम करत असताना ग्राहकांची कुठेही हेळसांड होऊ दिली नाही. त्याचबरोबर सामाजिक कार्यामध्ये नेहमी अग्रेसर राहत आहेत . विशेष म्हणजे गेल्या तेवीस वेळा रक्तदान करून आज दिनांक 30 ऑक्टोबर रोजी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान करून 24 वेळा वाढदिवसा निमित्त रक्तदान केले .त्यांच्या रक्तदानामुळे अनेक रुग्णांना जीवदान मिळाले असेल आणि रक्तदान हेच श्रेष्ठदान असून आपण या माध्यमातून अशा प्रकारे एक समाजसेवाच करत असल्याचे त्यांच्या चेहऱ्यावर समाधान असल्याचे भाव दिसत होते .याविषयी बोलताना रवी शेठ मेहेर यांनी असे सांगितले की चोवीस वेळा रक्तदान करून या रक्तदानामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचतील याचे मला मनोमनी समाधान आहे . प्रत्येकाने किमान वर्षातून एकदातरी रक्तदान करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी बोलताना केले. त्यांच्या या उपक्रमाबद्दल व वाढदिवसानिमित्त आदर्श शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब महाडिक, डॉक्टर नदीम शेख ,पत्रकार दादासाहेब बन, पत्रकार शरद तळेकर ,मुजाहिद शेख, आमदार बाळासाहेब आजबे यांचे स्वीय सहाय्यक डॉ. सुनील पारखे ,युवा नेते भाऊसाहेब घुले ,राजेंद्र जरांगे ,मुन्ना शेख,दिलीप आबा जगताप आदींनी अभिनंदन केले.
COMMENTS