*नायगाव / प्रतिनिधी* ( रामप्रसाद चन्नावार )
*शिवबा संघटना महाराष्ट्र च्या वतीने शिक्रापूर पुणे येथे शिवबा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष. राजेंद्र जराड याच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते,सदर बैठकीमध्ये साईनाथ गणपतराव कानोले यांची नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख पदी निवड करून त्यांना निवडीचे पत्र देऊन सत्कार करण्यात आला.*
*याप्रसंगी गोविंद कुंमकर युवा प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र ,गणेश दादा शिंदे प्रदेशाध्यक्ष, दिव्या ताई पाटील युवती प्रदेशाध्यक्ष, देविदास पाटे पाटील प्रदेश संपर्कप्रमुख, ज्ञानेश्वर देवडे पाटील महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष, श्रीराम कुरमकर,हरिभाऊ केसभट,मंगलताई शिंदे.पुणे जिल्हा अध्यक्ष ,अर्चना शितोळे पुणे जिल्हा उपाध्यक्ष ,दिलीप वायकर पुणे ,गणेश पवार पुणे, नितीन शिंदे मुंबई ,गंगाराम शिंदे ,गोविंद मोरे अंचोलीकर जिल्हाध्यक्ष ,*
*शिवबा संघटना एक मराठा समाज नव्हेतर सर्व बहुजन समाजाला सोबत घेऊन चालणार ,व सर्व समाजावरील*
*अन्याय अत्याचार विरुद्ध लढण्यासाठी खंबीरपणे उभा राहणार आहे*
*सामाजिक कार्यकर्ते साईनाथ कानोले यांनी कांही वर्षांपासून सामाजिक कार्य करत असताना त्यांनी अनेक जाती धर्मातील नागरिकांना न्याय देण्याचा काम केलं आहे अनेकांच्या अडीअडचणीत धाऊन जाऊन त्यांना मदत* *करण्याचा काम केले अस्सल्याची दखल शिवबा संघटनेचे* *संस्थापक अध्यक्ष* *राजेंद्र गराड यांनी घेऊन*
*साईनाथ कानोले यांची नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून निवड करण्यात आली अडल्याने त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे.*
COMMENTS