===================================
केज / प्रतिनिधी
दोन दुचाकींची समोरासमोर जोराची धडक होऊन झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना केज - कळंब रस्त्यावरील मांगवडगाव फाट्याजवळ घडली.
या प्रकरणी युसुफ वडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
धारूर शहरातील झाले गल्ली भागातील अजीम हकिम शेख बार्शी येथे सासुरवाडीतील कार्यक्रमासाठी ९ ऑक्टोबर रोजी रात्री दुचाकीवरून निघाले होते रात्री ८.३० वाजेच्या सुमारास त्यांच्या दुचाकीला केज- कळंब रस्त्यावरील मांगवडगाव फाट्याजवळ कळंब कडून भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने (एम. एच. ४४ डब्ल्यू ८२०८) समोरासमोर जोराची धडक दिल्याने या अपघातात अजीम शेख हे गंभीर जखमी झाले. उपचार साठी त्यांना तातडीने येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. ११ ऑक्टोबर रोजी सलीम चाँदसाहेब शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एम. एच. ४४ डब्ल्यू ८२०८ या क्रमांकाच्या दुचाकी चालकाविरुध्द पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास जमादार जनार्दन कांबळे हे करत आहेत.
COMMENTS