*विनयशील व्यक्तीमत्त्व - विनायक मामा

*        साधारणत: राजकीय क्षेत्रातील मंडळी म्हटलं की समोर येतो भपकेबाजपणा, राजकीय दबदब्यातून मिळवलेल्या संपत्तीचं ओंघळवाणं प्रदर्शन, चेहर्या...

*


 


     साधारणत: राजकीय क्षेत्रातील मंडळी म्हटलं की समोर येतो भपकेबाजपणा, राजकीय दबदब्यातून मिळवलेल्या संपत्तीचं ओंघळवाणं प्रदर्शन, चेहर्यावर असलेला जन्मजात उन्मत्त आणि माजोरडा भाव.. पण या सगळ्याला छेद देत काही माणसं अशीही असतात जी आपल्या मधाळ शब्दांनी, मनमोहक हास्याने व आपलंस करणार्या व्यक्तिमत्त्वामुळे इतरांपेक्षा दैदिप्यमान वाटतात आणि त्याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे भारतीय जनता पक्षाचे नेते श्री. विनायक रत्नपारखी उर्फ सर्वांचे लाडके "मामा"..


 


किशोरवयात आई बापाचं छत्र हरवलेल्या विनायकरावांच्या आयुष्यातील सुरुवातीचा काही काळ अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत व्यतित झाला.. खडतर परिस्थितीतून घेतलेलं शिक्षण व त्यातून माजलगांवमध्ये झालेली व्यावसायिक सुरुवात, व्यावसायिकतेतून समाजकारण आणि शेवटी राजकारण असा प्रवास करत करत हे व्यक्तिमत्त्व आज राजकारणात एका विशिष्ट पातळीवर यशस्वीरित्या येऊन पोहोचलं आहे..


 


मामा म्हणजे एक अजातशत्रू ,शांत, संयमी,श्रजनशील व्यक्तिमत्व आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.. साधारणपणे पुढारी म्हणजे मग्रुर असतात असा सार्वजनिक समज आहे पण समोर आलेली व्यक्ती मग ती वयाने लहान असो वा मोठी,गरीब असो वा श्रीमंत ,कार्यकर्ता असो वा पदाधिकारी वा सामान्य व्यक्ती अशा सर्वांना सन्मानाची वागणूक देऊन प्रत्येकासोबत आपलेपणाचे एक प्रेमळ नाते तयार करणारं व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचा अवश्य उल्लेख केला जातो..


 


आपण ज्या समाजात वावरतो त्या समाजाप्रती आपली बांधिलकी जपनारी फार थोडी माणसं असतात..


मामांनी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीच्या माध्यमातून अभ्यासिका स्थापण करणे, गरजू व गरीब लोकांसाठी वेळोवेळी विविध प्रकारे मदत किंवा आधार देण्याचं काम सतत मामांच्या हस्ते होतं.. रोटरीक्लब ऑफ माजलगाव सिटीच्या माध्यमातून सामाजिक कार्याचा श्री गणेशा करुन आज मामा एक नगरसेवक संबोधण्याऐवजी समाजसेवक म्हणून संबोधले जातात.. 


राजकारण हा बदमाशांचा शेवटचा अड्डा असं आपण म्हणतो पण अशा बेभरवशाच्या क्षेत्रात मामा एक "आपला हक्काचा माणूस" वाटतात.. राजकीय गणितं-तडजोडी किंवा पेच-डावपेच यात ते कितपत यशस्वी झाले हा मुद्दा वेगळा असला तरी ते एक माणुस म्हणुन शंभर नंबरी सोनं म्हणून सिद्ध झालेले आहेत..


राजकारण हा शक्यता-अशक्यतांचा खेळ मानला जातो,


कधी कुणाच्या मनीमानसी नसताना मामा नगरसेवक झाले, त्या पाठोपाठ गटनेते,भाजपचे तालुका प्रवक्ते आणि सभापतीदेखील झाले.. आपलं पुर्वपुण्य आपल्या नक्की कामी येतं हे मामांच्या वाढत्या राजकीय आलेखाकडे बघून समजतं कारण भूतकाळात केलेल्या निरपेक्ष सामाजिक कामाच्या माध्यमातून लाभलेल्या सदिच्छा आणि आशिर्वाद मामांना राजकीय यशाच्या शिखरावर ठेवण्याच्या कामी आल्या..


 


केवळ सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात मर्यादित वावर म ठेवता मामांनी सहकार व शिक्षण क्षेत्रातही सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे..


माजलगांवमधील उच्चतम शैक्षणिक दर्जा असणार्या यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक म्हणून मामा कार्यरत आहेत..


भाजपचे राज्य पातळीवरील नेते श्री. डॉ प्रशांत पाटील यांच्या सिद्धिविनायक अर्बन सहकारी संस्थेच्या उभारणीत व तिच्या यशस्वी प्रवासात विनायक मामांची साथ नक्कीच नोंदणीय आहे..


ब्राम्हण समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणार्या परशुराम सेवासंघाचे राज्य शाखेचे उपाध्यक्ष म्हणून मामा सक्रिय आहेत..


सर्वसाधारणपणे राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना ऐतिहासिक गोष्टी माहित असणं आवश्यक असतं व हाच धागा पकडून माजलगांव येथे कार्यरत असणार्या शिवशंभू विचार दर्शनचे सदस्य म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांचं कार्य शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यात मामा आग्रही आहेत..


 


राष्ट्र प्रथम या संकल्पनेला अग्रस्थानी मानून आयुष्याची ध्येयनिश्चिती केलेला प्रखर राष्ट्रभक्त,


साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे तत्व अंगिकारलेला एक राजकारणी,


एक व्यावसायिक,


सहकारी संस्थांचा सक्रिय सदस्य,


अभ्यासू व उत्तम वक्ते, कुशल संघटक, एक आदर्श पती-पिता-भाऊ,


अठरापगड जातीधर्माच्या लोकांशी सलोख्याचे संबंध असणारा जिवाभावाचा "आपला माणुस",


प्रत्येकाच्या सुख दुःखात सहभागी होणारा सर्वांचा पारिवारिक सदस्य,


भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक,गटनेते तालुका प्रवक्ते तथा नगरपरिषदेचे सभापती सर्वांचे लाडके असे विनायक मामा रत्नपारखी यांना अभिष्तचिंतनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!! ओम देशमुख जिजामाता नगर माजलगाव .


COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group