===================================
चिंचोली माळी च्या शिरपेचात मानाचा तुरा
===================================
केज /प्रतिनिधी
केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील रहिवासी चि. संकेत गंगाधर काळे याने राष्ट्रीय पात्रता सह परीक्षेत (NEET) मधे 720 पैकी 585 गुण मिळवून यश संपादित केले आहे.
याविषयी सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील चिंचोली माळी येथील रहिवासी चि. संकेत गंगाधर काळे यांनी दहावीपर्यंत शिक्षण केज येथील स्वामी विवेकानंद शाळेत घेतले व नंतर त्याला लातूर येथील राजश्री शाहू महाविद्यालयात प्रवेश मिळाला. संकेत सुरुवातीपासूनच मेहनती, जिद्दी, चिकाटीचा असल्यामुळे त्याने प्रथम संधीतच, तसेच कुठलेही खाजगी क्लासेस न लावता यश मिळविले आहे. विशेष म्हणजे त्याच्या महत्त्वाच्या वेळेतच म्हणजे कॉलेजला प्रवेश घेताच त्याच्या वडिलांचे निधन झाले. तरी न डगमगता त्याने परिस्थितीचा सामना करीत अगदी प्रतिकूल परिस्थितीत जिद्द, चिकाटी व सातत्याच्या जीवावर राष्ट्रीय पात्रता सह परीक्षेत ७२० पैकी ५८५ गुण मिळवून वैद्यकीय प्रवेशास पात्र झाला आहे. त्यामुळे त्याने काळे परिवारा बरोबरच गावाचीही मान उंचावली आहे. त्यामुळे त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
COMMENTS