विकास धात्रक यांने शिवस्मारक उभारणीसाठी वाढदिवसानिमित्त दिला पाच हजार पाचशे पंचावन्न रुपयांचा निधी
आष्टी (प्रतिनिधी) आष्टी पासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या कडा कारखाना येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा असून या पुतळ्या भोवती सुशोभिकरण करण्यात आलेले आहे .या ठिकाणी शिवस्मारक उभा करण्याचे योजिले असल्याने आतापर्यंत अनेक दानशूरांनी या शिवस्मारकासाठी निधी दिलेला आहे .जळगावचे रहिवासी असलेले युवा नेते विकास धात्रक यांनी आपल्या वाढदिवसावर अनावश्यक खर्च न करता कडा कारखाना येथील मेन रोडवर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवस्मारकासाठी 5555 रुपये रोख स्वरूपात निधी जळगाव चे सरपंच राम धुमाळ यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी पत्रकार दादासाहेब बन,संतोष टकले, ताराचंद कानडे ,जगदीश पिसाळ ,राहुल ढोबळे ,प्रताप धुमाळ ,अमीर शेख यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते विकास धात्रक यांनी शिवस्मारकाला निधी देऊन आपला वाढदिवस साजरा केल्याने या युवकाचे कौतुक होत आहे.विकास धात्रक या युवकाने घेतलेला निर्णय अतिशय उल्लेखनीय असून त्यांच्या या निर्णयाचे शिवस्मारक समितीच्यावतीने अभिनंदन करण्यात आले. यावेळी बोलताना सरपंच राम धुमाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून यांचे स्मारक याठिकाणी उभा करण्याचा निर्णय गेल्या काही दिवसापूर्वी घेतला आणि या स्मारक उभा करण्यासाठी लागणारा निधी अनेक दानशूर व्यक्तींनी शिवस्मारक समितीकडे जमा केलेला आहे. परंतु त्याला लागणारा खर्च खूप असल्याकारणाने आणखी आर्थिक मदतीची गरज असून विकास धात्रक या युवकाने वाढदिवसावर अनावश्यक खर्च न करता हा पैसा शिवस्मारक उभा करण्यासाठी उपयोगी यावा हा विकासचा निर्णय समाजामध्ये प्रेरणादायी असून अशा प्रकारचा निर्णय इतर समाज बांधवांनी ,शिवप्रेमी यांनी घ्यावा असेही यावेळी सरपंच राम धुमाळ यांनी आवाहन केले. .
COMMENTS