*
*इमारतीचे बांधकाम पुर्णत्वास,तर उर्वरित काम लवकरात लवकर पुर्ण करण्याच्या केल्या सुचना...*
केज ! प्रतिनिधी
*विडा प्रा.आरोग्य केंद्राची मुख्य ईमारत व कर्मचारी निवासाचे बांधकाम पूर्ण झाले आसून कलर,लाईट फीटींग तसेच ट्रान्सफार्मर,मेनलाईट व कंपाउंड वाॅलचे काम सध्या प्रगतीपथावर आसून शनिवारी विडा गटाचे लोकप्रिय जिल्हा परिषद सदस्य विजयकांत मुंडे यांनी कामाची प्रत्यक्ष पाहणी केली आसून लवकरात लवकर काम पूर्ण करण्याच्या सूचना संबंधितांना केल्या आहेत.*
केज तालुक्यातील विडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतून ईमारत बांधकामासाठी लोकनेत्या पंकजाताई मुंडे व जिल्याच्या लोकप्रिय खा.डॉ प्रितमताई मुंडे यांच्या माध्यमातून विडा गटाचे लोकप्रिय जिल्हा परिषद सदस्य विजयकांत मुंडे यांनी सातत्याने पाठपुरावा करत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत तब्बल 5 कोटी 85 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करून घेतला होता.दरम्यान मागील काही
महिन्यापूर्वी इमारतीच्या नूतून बांधकामाच्या कामाचा प्रत्यक्ष शुभारंभ करण्यात आला होता.दरम्यान आजच्या घडीला इमारतीचे बांधकाम पुर्णत्वास जात आसून लाईट फिटींगची काम सध्या प्रगतीपथावर आहे.शनिवारी दु.१ वा.विडा गटाचे लोकप्रिय जिल्हा परिषद सदस्य विजयकांत मुंडे यांनी मुख्य ईमारत व कर्मचारी निवासाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली आसून उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना सबंधितांना देण्यात आल्या आहेत.यावेळी डाॅ.शिला कांबळे,डाॅ.लव्हारे साहेब, चंद्रकांत कुलकर्णी,बारीकराव भोसले,बाजीराव कोरडे,अंकुश जोगदंड यांची उपस्थिती होती.
COMMENTS