*शिष्यवृत्ती परीक्षेत येवती शाळेचे नेत्रदीपक यश.*

*शिष्यवृत्ती परीक्षेत येवती शाळेचे नेत्रदीपक यश.*


 


धर्माबाद (अहमद लड्डा


 धर्माबाद तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी गुणवत्ता विकासात अग्रेसर असणाऱ्या उच्च प्राथमिक शाळा येवती च्या विद्यार्थ्यांनी उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत नेत्रदीपक यश प्राप्त केले आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांचे तालुका शिवसेनाप्रमुख श्री आकाशभाऊ रेड्डी येताळकर ,सभापती पंचायत समिती धर्माबाद श्री मारुती पाटील कागेरू, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री बालाजी पाटील भोसले, सरपंच श्री पांडुरंग वाघमारे , गटशिक्षण अधिकारी श्री दाजीबा गोडबोले, केंद्रप्रमुख संजय कदम व चिकना केंद्रातील शिक्षक 


वृंदांनी अभिनंदन केले आहे. 


 उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र होऊन गुणानुक्रमे कु. शितल पांचाळ ,गजानन पेंडकर, कु.भार्गवी मुदलोड,कु.रोशनी बोईनवाड ,कु.समीक्षा इरलोड. तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत कु.संध्या मलकी ,कु.श्रावंती सोनकांबळे, सर्वेश कानगुलवार,कु. कांचन पडोळे या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळविले आहे. 


शिष्यवृत्ती वर्गाचे नियोजन, सराव चाचण्या, शिक्षकांची मेहनत व पालकांचे सहकार्य यामुळेच आम्ही हे यश मिळवू शकलो अशी प्रतिक्रिया उपक्रमशील मुख्याध्यापक श्री शिवकुमार पाटील यांनी दिली.



टिप्पण्या